मुर्शिदाबाद (बंगाल) येथील घटना
मुर्शिदाबाद (बंगाल) – येथील बेलडांगा विभागातील हरिमती शाळेजवळील सरबोजनिन कार्तिक पूजा मंडपाच्या प्रवेशद्वारावर अल्लाचा अवमान करणारी दिव्यांची सजावट केल्यावरून धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर आक्रमण केले. येथे हिंदूंची घरे आणि दुकाने जाळण्यात आली. कथित अवमानाच्या घटनेचे व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर स्थानिक मशिदींमधून आणि इंटरनेटद्वारेही मोठ्या प्रमाणात चिथावणी दिल्यानंतर धर्मांध मुसलमानांनी आक्रमण चालू केले.
🚨Hindus attacked by bigoted Mu$|!m$ over alleged ‘disrespect’ towards Allah through Kartik Puja Decorations in Bengal’s Murshidabad
👉 To ensure the safety of #Hindus and restore law and order in #Bengal, the Central Government must immediately impose President’s Rule in the… pic.twitter.com/Hql56yrsLX
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 17, 2024
१. लोकांचे म्हणणे आहे की, येथे कार्तिक पूजा समितीने मंडप आणि प्रवेदाद्वार यांच्या निर्मितीचे कंत्राट ‘माजेरपारा इलेक्ट्रिकल मार्ट’चे मालक एस्.के. बशीर यांना दिले होते. त्यांनी जी दिव्यांची सजावट केली होती, त्याद्वारे अल्लाचा अवमान झाल्याचा आरोप करण्यात आला, तसेच या सजावटीमधील २ मुसलमान कामगार बेपत्ता झाल्याचाही आरोप करण्यात आला.
२. या प्रकरणी भाजपचे माध्यम शाखेचे प्रमुख अमित मालवीय यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, कार्तिक पूजेच्या दिवशी मुसलमानांनी मुर्शिदाबादच्या बेलडांगा येथील हिंदूंच्या घरांवर आक्रमण केले. ममता बॅनर्जी यांच्या पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. बंगाल हिंदूंसाठी ‘कब्रस्तान’ बनले आहे. हिंदूंंचा प्रत्येक सण आणि पूजा यांवर आक्रमण केले जाते.
३. सामाजिक माध्यमांत प्रसारित होणार्या व्हिडिओवरून एक मुसलमान तरुण इतर मुसलमानांना हिंदूंना ठार मारण्याची चिथावणी देत असल्याचे दिसत आहे.
४. मुर्शिदाबादच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाने सांगितल्याप्रमाणे बेलडांगातील परिस्थिती नियंत्रणात असली, तरी अजूनही ती तणावपूर्ण आहे. हिंदूंवर आणखी आक्रमणे होण्याची भीती आहे. धार्मिक सलोखा बिघडवण्यात गुंतलेल्यांची गय केली जाणार नाही. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून शांतता राखण्यासाठी पोलीस दोन्ही गटांशी चर्चा करत आहेत.
संपादकीय भूमिकाबंगालमधील हिंदूंचे रक्षण करून तेथील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्र सरकारने तेथे तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करणे आवश्यक आहे ! |