नेताजी बोस यांच्या कार्यक्रमात ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणे अयोग्यच ! – रा.स्व. संघ

या कार्यक्रमामध्ये ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्याचे समर्थन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करत नाही

कोलकाता (बंगाल) – २३ जानेवारीला कोलकाता येथे पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीचा कार्यक्रम एका महान स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्याचे समर्थन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करत नाही, असे बंगालचे रा.स्व. संघाचे सरचिटणीस जिश्‍नू बासू यांनी म्हटले आहे. या घोषणाबाजीमुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संताप व्यक्त करत भाषण करण्यास नकार दिला होता.

रा.स्व. संघाचे सरचिटणीस जिश्‍नू बासू

बासू म्हणाले की, घडलेल्या प्रकारामुळे संघ अप्रसन्न आहे. ज्या लोकांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या ते नेताजींचाही सन्मान करत नाहीत आणि त्यांना ‘श्री रामा’विषयीही आस्था नाही. या प्रकरणामध्ये घोषणा देणार्‍या व्यक्तींचा शोध घेताला जावा, अशी मागणी त्यांनी भाजपकडे केली आहे.