PM Garib Kalyan Anna Yojana : गरीब हिंदूंकडून सरकारी तांदूळ दान घेऊन त्याची बाजारात केली जात आहे विक्री !

  • ‘पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजने’चा ख्रिस्ती मिशनरी उठवत आहेत अपलाभ !

  • विक्रीच्या पैशांतून केला जात आहे धर्मांतराचा व्यवसाय !

  • वार्षिक १०० कोटी रुपयांची उधळपट्टी होत असल्याचा संशय !

प्रतिकात्मक छायाचित्र

रायपूर (छत्तीसगड) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबांसाठी बनवलेल्या ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना’ आणि राज्य सरकारची ‘अन्नपूर्णा योजना’ यांचा ख्रिस्ती मिशनरी अपलाभ उठवत असल्याचे निदर्शनास आले आहे. ख्रिस्ती मिशनरी गरिबांना वाटण्यात येणार्‍या सरकारी तांदळातून एक मूठ तांदूळ दान घेतात. प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्य प्रतिदिन मूठभर तांदूळ दान करतो. हा तांदूळ मोठ्या प्रमाणावर गोळा करून मिशनर्‍यांकडून तो खुल्या बाजारात २५ ते ३० रुपये प्रतीकिलो या भावाने विकला जात आहे. याद्वारे मिशनर्‍यांना वार्षिक उत्पन्न १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळत असल्याचा अंदाज आहे. यातूनच त्यांना प्रत्येक गावातील धर्मप्रचारकांना पगार आणि इतर सुविधा पुरवण्याचे साधन मिळाले आहे.

छत्तीसगड राज्यातील ३.०५ कोटी लोकांपैकी अनुमाने २.५ कोटी लोकांना शासकीय अन्न योजनेचा लाभ मिळत आहे. राज्यामध्ये ४ सदस्यांच्या कुटुंबाला महिन्याला ३५ किलो तांदूळ दिला जातात. याच्या अपवापरामुळे समाजात नवी आव्हाने निर्माण होत आहेत. वर्ष २०१९ पासून लागू झालेल्या ‘विदेशी योगदान नियमन कायद्या’तील कठोर कार्यवाहीमुळे (अंमलबजावणीमुळे) मिशनर्‍यांना परदेशातून पैसे मिळवण्यास अडथळे निर्माण झाले आहेत. तेव्हापासून त्यांनी तांदूळ संकलनाचा हा वेगळाच प्रकार चालू केला.

ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या विळख्यात सापडले छत्तीसगड राज्य !

छत्तीसगड राज्यातील सर्वाधिक प्रभावित असलेल्या जशपूर जिल्ह्यात ख्रिस्त्यांची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. वर्ष २०११ मध्ये जिल्ह्यात १.८९ लाख ख्रिस्ती होते. ही संख्या एकूण लोकसंख्येच्या २२.५ टक्के होती. सध्या ही संख्या ३५ टक्के, म्हणजेच ३ लाखांच्या पुढे गेल्याचा अंदाज आहे. अंबिकापूर, रायगड आणि बलरामपूर या इतर मिशनरी प्रभावित जिल्ह्यांमधून मिशनरी प्रतिवर्षी ५० ते ५५ कोटी रुपये गोळा करत आहेत.

हिंदुत्वनिष्ठ संघटनांची भूमिका !

१. बजरंग दलाचे माजी अध्यक्ष नितीन राय यांच्या म्हणण्यानुसार, मिशनरी लोक उपचार सभांद्वारे हिंदूंना धर्मांतरित करत आहेत.

२. धर्मांतराच्या विरोधात सक्रीय असलेल्या कल्याण आश्रमाचे न्यायिक सल्लागार सत्येंद्र तिवारी म्हणाले की, मिशनर्‍यांना आता केवळ शाळा आणि रुग्णालये यांसाठी परदेशी निधी मिळू शकतो. अशा परिस्थितीत सरकारी योजनांतून दिलेला तांदूळ, हाच त्यांचा आर्थिक आधार बनला आहे.

संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करणार ! – सरकार

छत्तीसगडचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री दयाल दास बघेल यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, केंद्र सरकार गरिबांना धान्य देत आहे. काही लोक अपवापर करून धर्मांतरासाठी त्याचा वापर करत असतील, तर हे गंभीर सूत्र आहे. आम्ही संपूर्ण प्रकरणाची चौकशी करू. संबंधितांविरुद्ध कठोर कारवाईचे मी आश्‍वासन देतो.

कसा उघड झाला प्रकार ?

वर्ष २०२० मध्ये जशपूरमधील ख्रिस्त्यांच्या समरबहार गावातील उपचार सभेत पकडलेल्या १० लोकांनी ‘एक मुठी चावल योजने’विषयी माहिती दिली होती. जशपूरच्या जुर्गम गावात नुकतेच जानेवारी २०२४ मध्ये अटक करण्यात आलेल्या लोकांनीही याला दुजोरा दिला होता.

संपादकीय भूमिका

  • छत्तीसगडमध्ये आता भाजपचे सरकार आल्यामुळे या अपप्रकारावर आळा बसला पाहिजे, अशी जनतेची अपेक्षा आहे. तेथील हिंदूंनी यासाठी सरकारवर दबाव आणणे आवश्यक आहे !
  • गोर-गरिबांना साहाय्य करण्याचा आव आणणार्‍यांकडून ख्रिस्ती मिनशर्‍या त्यांच्या तोंडातील घास पळवत आहेत. ख्रिस्त्यांचा हा जनताद्रोही चेहरा जाणा !