बेंगळुरू (कर्नाटक) – मुलगा सारखा भ्रमणभाष वापरतो, शाळेत जात नाही, अभ्यासाकडे लक्ष देत नाही, वाईट मुलांची संगत सोडत नाही, यामुळे संतप्त झालेल्या वडिलांनी त्यांच्या १४ वर्षांच्या मुलाला क्रिकेटच्या बॅटने मारहाण करून ठार मारले.
वडील आणि मुलगा यांच्यात बिघडलेला भ्रमणभाष दुरुस्त करण्यावरून १५ नोव्हेंबरला भांडण झाले. त्यानंतर संतापलेल्या रवि कुमार यांनी स्वतःच्या मुलाला क्रिकेटच्या बॅटने मारहाण केली. त्यांनी मुलाला भिंतीवर अनेकदा आपटले. या मारहाणीत १४ वर्षीय तेजसचा मृत्यू झाला. ‘तू जगला किंवा मेलास तरी आता मला फरक पडत नाही’, असे वाक्य रवि कुमार मुलाला मारहाण करत असतांना म्हणत होते, अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी रवि कुमार यांना अटक केली आहे.