|
गोपाळगंज (बिहार) – जिल्ह्यात नुकत्याच ८० वर्षीय दलित हिंदु वृद्धेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पीडित महिला तिच्या शेतात गवत कापायला गेली होती. त्याच वेळी सय्यद अली (छोटे आलम) नावाचा वासनांध तिथे आला आणि त्याने महिलेला पकडून तिच्यावर बलात्कार केला. १४ मार्चला झालेल्या या घटनेनंतर त्याने त्या वृद्धेचे डोळे काढण्याचा प्रयत्न केला. ती मृत झाल्याचे समजून तो तिथून पळून गेला. या प्रकरणी महिलेच्या कुटुंबियांनी वैकुंठपूर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे. या प्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
१. पीडित महिलेची प्रकृती इतकी वाईट होती की, १९ तासांनंतर ती शुद्धीवर आली. शुद्धीवर आल्यानंतर तिने सांगितलेल्या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला. तिचा मुलगा सय्यद अलीच्या घरी गेला; पण सय्यद अलीसह तेथे उपस्थित असलेले बाबुद्दीन, शहाबुद्दीन, सद्दाम, हशमत आणि जुम्मादीन यांनी त्याला जातीवाचक अपशब्द म्हणून अन् जिवे मारण्याची धमकी देऊन हाकलून लावले.
२. या प्रकरणात मुख्य आरोपीच्या व्यतिरिक्त पोलिसांनी त्याच्या कुटुंबातील इतर चार सदस्यांविरुद्धही गुन्हा नोंद केला आहे, अशी माहिती वैकुंठपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी अभय कुमार रंजन यांनी दिली.
हिंदुद्वेष्टी प्रसारमाध्यमे !या घटनेचे वृत्त प्रसारित करतांना ‘टाइम्स ऑफ इंडिया’, ‘ई टीव्ही भारत’, ‘दी ऑब्जर्वर पोस्ट’ यांसारख्या काही प्रसारमाध्यमांनी संबंधित घटनेच्या पोलीस तक्रारीत बलात्कार्याचे नाव स्पष्ट लिहिलेले असतांनाही त्यांच्या वृत्तात आरोपीचे नाव लपवले आहे. |
संपादकीय भूमिका
|