मुझफ्फरपूर (बिहार) – येथे शमशाद नावाच्या एका मुसलमान तरुणाने स्वतःची ओळख सूरज अशी करून एका हिंदु मुलीला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. हळूहळू त्याने तिच्याशी जवळीक साधली आणि तिचे लैंगिक शोषण चालू केले. पीडित मुलीने लग्नाविषयी विचारले असता त्याने त्याचे खरे नाव शमशाद असल्याचे सांगितले. त्याने पीडितेवर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला. तसेच त्याने तिला गोमांस खायला घातले. पीडित मुलीने २१ एप्रिल या दिवशी पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट (दाखल) केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शमशादच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिकामुसलमानांकडून हिंदु नावे धारण करून हिंदु युवतींना लव्ह जिहादमध्ये अडकवण्याची असंख्य प्रकरणे समोर येत आहेत. हे लक्षात घेऊन हिंदु युवतींनी सतर्क रहाणे आवश्यक ! |