Bihar Love Jihad : बिहारमध्ये सुमित असल्याचे सांगून अशरफ याने केले हिंदु युवतीवर लैंगिक अत्याचार

हिंदु युवतींना फसवून त्यांच्याशी लैंगिक संबंध ठेवणे,  हा छंद असल्याचे अशरफ याचे संतापजनक विधान

पीडित हिंदु युवती व आरोपी कमाल अशरफ

पाटलीपुत्र (बिहार) – बिहारमधील लखीसराय येथे कमाल अशरफ याने एका हिंदु युवतीचे १४ वर्षे लैंगिक शोषण केले. पीडित युवतीने नोंदवलेल्या तक्रारीत अनेक धक्कायदाक माहिती समोर आली आहे. त्यानुसार, ‘कमाल अशरफ याने सांगितले होते की, हिंदु तरुणींना फसवून त्यांना उपभोगाच्या वस्तू म्हणून ठेवणे हा ‘त्या लोकांचा’ (मुसलमानांचा) छंद आहे आणि ते हिंदु तरुणींशी कधीही लग्न करणार नाहीत.’

१. वर्ष २०१२ मध्ये पीडिता १६ वर्षांची असतांना राजस्थानमधील सुमित म्हणून स्वतःची ओळख करून देणार्‍या अशरफने तिला आमीष दाखवून पळवून नेले. त्यानंतर त्याने तिचे लैंगिक शोषण कले.

२. त्यानंतर अशरफ याने तिला न्यायालयात जाऊन ‘विवाह झाल्याची खोटी साक्ष देण्यास भाग पाडले; मात्र त्याने कधी तिच्याशी विवाह केला नाही. काही महिन्यांनी पीडितेने एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर अशरफने तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणण्यास चालू केले. त्या वेळी तिला सुमित हा अशरफ असल्याचे समजले.

३. अशरफ याने इस्लाम स्वीकारल्याविना तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. त्याने तिच्याकडील देवतांच्या मूर्ती फेकून दिल्या. तिने धर्मांतरास नकार दिल्यावर त्याने तिला गोमांस खायला लावले आणि धर्मांतर करण्यास भाग पाडले.

४. त्यानंतर अशरफ याने अन्य मुसलमान इब्राहिम अहमद याच्यासमवेत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी पीडितेवर दबाव आणला. त्यास तिने नकार दिल्यावर त्या दोघांनी तिला मारहाण केली आणि तिच्या गुप्तांगांना इजा करण्याचा प्रयत्न केला.

५. इब्राहिम अहमदने पीडितेला सांगितले की, जर तिने त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवले, तर अशरफ तिच्याशी लग्न करील.

६. त्यानंतर पीडित युवती नातेवाईकाच्या घरी पळून जाण्यात यशस्वी झाली आणि तिने पोलिसांत तक्रार नोंदवली.

संपादकीय भूमिका

अशरफ याच्या वक्तव्यावरून लव्ह जिहादचे खरे स्वरून स्पष्ट होते. ‘प्रेमाला धर्म नसतो’, असे म्हणणार्‍या निधर्मीवाद्यांना हिंदु युवतींचे आयुष्य उद्ध्वस्त करणार्‍या लव्ह जिहाद्यांविषयी काय म्हणायचे आहे ?