Bihar Constable Murder : बिहारमध्ये पोलीस हवालदाराकडून सहकारी पोलिसाची ११ गोळ्या झाडून हत्या

हत्या झालेल्या पोलिसाचा आरोपीच्या पत्नीशी होणारा संवाद ठरले कारण

आरोपी पोलीस सरबजित (डावीकडे) हत्या झालेला पोलिस सोनू कुमार (वर्तुळात)

बेतिया (बिहार) – येथे एका पोलीस हवालदाराने त्याच्या सहकारी पोलीस हवालदारावर ११ गोळ्या झाडून त्याची हत्या केली. १९ एप्रिलला रात्री ही घटना घडली. सरबजित असे या आरोपी पोलीस हवालदाराचे, तर सोनू कुमार असे हत्या झालेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. सोनू कुमार याचे सरबजितच्या पत्नीशी होत असलेल्या संवादामुळे सरबजित अस्वस्थ होता आणि त्यातून त्याने हे कृत्य केल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.

संपादकीय भूमिका

वैयक्तिक कारणामुळे एकमेकांची हत्या करणारे पोलीस जनतेचे काय रक्षण करणार ?