हिंदूंना पैशांचे आमीष दाखवून धर्मांतरचा केला जात होता प्रयत्न !
सारण (बिहार) – सारण जिल्ह्यातील रविलगंज भागात बांधकाम चालू असणारे चर्च संतप्त लोकांकडून पाडण्यात आले. शाळेच्या नावाखाली हे चर्च बांधले जात होते. गावकर्यांचा आरोप आहे की, ख्रिस्ती मिशनरी त्यांना आमिष दाखवत होते आणि ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास भाग पाडत होते.
विशेष पोलीस अधीक्षक आशिष यांनी सांगितले की, या प्रकरणी गुन्हा नोंदवून एका ग्रामस्थाला कह्यात घेण्यात आले आहे. ८ एप्रिल या दिवशी सामाजिक माध्यमांतून एक व्हिडिओ प्रसारित झाला होता, ज्यामध्ये परिसरात ख्रिस्ती धर्मांतराची चर्चा होती. पोलिसांना अद्याप धर्मांतराचे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत; परंतु प्रकरण गंभीर असल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी अधिक अन्वेषण करत आहेत.
🚨 Villagers in Revelganj, Saran Dt. (Bihar) demolish a church allegedly being built under the guise of a school 🏫✝️
Attempts were being made to convert Hindus using financial lures 💰
Lack of strict anti-conversion laws is emboldening missionary activities.
What began under… pic.twitter.com/FRVbzVWdyt
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 11, 2025
आमीष दाखवून धर्मांतराचा प्रयत्न चालू केला होता !
गावकर्यांचा आरोप आहे की, चर्चचे बांधकाम २ वर्षांपासून चालू होते. रामनाथ मांझी नावाच्या एका स्थानिक व्यक्तीने ३ एप्रिल २०२५ या दिवशी या विरोधात तक्रार नोंदवली होती. मांझी म्हणाले की,
१. जहानाबाद येथील ज्योती प्रकाश नावाची व्यक्ती भूमी खरेदी करून शाळा बांधण्याबद्दल बोलत होती. गावकर्यांनीही शाळा समजून बांधकामात साहाय्य केले; पण नंतर तिथे चर्चचा फलक पाहून सर्वांनाच धक्का बसला; मग मिशनर्यांनी गावकर्यांना ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास प्रवृत्त करायला चालू केले. यामुळे लोक संतापले आणि ते चर्चविरुद्ध उभे राहिले.
२. मिशनरी हळूहळू बांधकाम चालू असलेल्या इमारतीत येऊ लागले आणि प्रत्येक रविवारी प्रार्थना करू लागले. प्रार्थनेत सहभागी झालेल्यांना एका पाकिटातून प्रत्येकी १ सहस्र रुपये देण्यात आले. लोकांना पैसे आणि अन्यधान्य यांचे आमिष दाखवून त्यांना अडकवले जात होते.
३. मिशनर्यांनी सांगितले की, जर त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला तर त्यांच्या मुलींच्या लग्नाचा आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलला जाईल. त्यांनी छठपूजेसारखे हिंदु सण साजरे करण्यापासून लोकांना रोखण्यास चालू केले.
४. मिशनर्यांनी गावकर्यांना विशेष पाण्याच्या बाटल्या दिल्या आणि २० दिवस ते पिण्यास सांगितले. तसेच ‘हालेलुयाह’ (येशूची स्तुती करणे) म्हणण्याचा सल्ला दिला. ‘तुमच्या देवाची पूजा करणे थांबवा, येशूवर विश्वास ठेवा, मग तुमचे दुःख दूर होईल’, असे ते सांगत होते.
सारणमध्ये यापूर्वीही चर्चला विरोध झाला आहे !
सारणमध्ये यापूर्वीही धर्मांतराचे एक प्रकरण समोर आले होते. वर्ष २०२२ मध्ये जाटुआन गावात एक चर्च बांधले जात होते, ज्याला दलितांनी विरोध केला होता. एका स्थानिक रहिवाशाने आरोप केला होता की, त्यांना १ लाख रुपयांचे आमिष दाखवण्यात आले. गावकर्यांच्या विरोधामुळे ख्रिस्ती मिशनरी पळून गेले; ते सर्व आंध्रप्रदेशातील असल्याचे सांगण्यात आले होते.
संपादकीय भूमिका
|