हिंदी चित्रपटसृष्टीत स्त्रीच्या गुणवत्तेपेक्षा तिच्या शरिराला अधिक महत्त्व दिले जाते ! – अभिनेत्री पायल घोष

हिंदी चित्रपटसृष्टीचे हे वास्तव आज जगाला ठाऊक आहे. अशी चित्रपटसृष्टी समाजामध्ये कधीतरी नैतिकता निर्माण करण्यासाठी चित्रपटांद्वारे प्रबोधन करू शकेल का ?

धार्मिक भावना दुखावल्यावर मोर्चा काढू नका : सरकार नक्की कारवाई करणार !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना, फादरने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करणे आणि इस्लामच्या विरोधात माहिती प्रसारित करणे या सर्वही प्रकरणांत सरकारने कठोरतेने कारवाई केली आहे.

गोव्यात प्रभु श्रीरामाविषयी मुसलमानाकडून सामाजिक माध्यमातून अश्लील माहिती प्रसारित !

धार्मिक भावना दुखावणार्‍यांवर कारवाई होणार आहे. कायद्यासमोर सर्व समान आहेत. गोवा राज्य धार्मिक सलोखा आणि शांतता यांसाठी प्रसिद्ध आहे अन् गोव्याची ही ओळख पुसण्याचा कुणीही प्रयत्न करू नये –  मुख्यमंत्री डॉ. सावंत

ट्रुडो अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर घाला घालत आहेत ! – मस्क

भारत-कॅनडा यांच्यातील वादात आता कोट्यधीश इलॉन मस्क जस्टिन ट्रुडो यांच्यावर भडकले !
‘ऑनलाईन स्ट्रिमिंग’ सेवांवर नियंत्रण आणण्यासाठी ट्रुडो यांनी दिलेल्या आदेशावर मस्क यांची टीका !

प्रेषित महंमद पैगंबर यांच्या विरोधात सामाजिक माध्यमात आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्याचे गोवाभर तीव्र पडसाद

संशयिताला त्वरित कह्यात घेण्याची मागणी मडगाव, फोंडा आणि म्हापसा येथे मुसलमानांनी संबंधित पोलिसांकडे केली आहे. मडगाव येथील दक्षिण गोवा पोलीस मुख्यालयात मुसलमानांनी ‘जोपर्यंत दोषीवर कारवाई होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातून जाणार नाही’, असा पवित्रा घेतला आहे.

मुंबईत लोकलमध्ये अश्‍लील नृत्‍य करणार्‍या तरुणीच्‍या व्‍हिडिओवर मुंबईकर संतापले

लोकलमध्ये एका तरुणीचा ‘बेली डान्‍स’ नावाचा अश्‍लील नृत्‍यप्रकार करतांनाचा व्‍हिडिओ प्रसारित होत आहे. प्रसिद्धी मिळवण्‍यासाठी तरुण-तरुणी अशा प्रकारच्‍या गोष्‍टी हल्ली मोठ्या प्रमाणात करतात; परंतु या व्‍हिडिओवर मुंबईकरांनी जोरदार संतप्‍त प्रतिक्रिया दिल्‍या आहेत.

सामाजिक माध्यमे वापरण्यासाठी वयोमर्यादा निश्‍चित करायला हवी ! – कर्नाटक उच्च न्यायालयाची सूचना

हे न्यायालयाला का सांगावे लागते ? सरकारला स्वतःला ते कळत का नाही ?

पोलिसांकडून गुन्हेगारी प्रकरणांविषयी प्रसारमाध्यमांना दिल्या जाणार्‍या माहितीविषयी नियमावली सिद्ध करा !

न्यायालयाने म्हटले की, पक्षपाती वार्तांकनामुळे गुन्हा करणार्‍या व्यक्तीविषयी लोकांमध्ये संशयाचे वातावरण वाढीस लागते. माध्यमांतील बातम्यांमुळे पीडिताच्या खासगीपणाचाही भंग होतो.

सिंधुदुर्ग : देहलीतील अल्पवयीन मुलगी वेंगुर्ल्यात सापडल्याच्या प्रकरणात आणखी एका मुसलमानाचा सहभाग

देहली येथून गायब झालेल्या आणि वेंगुर्ला येथे मुसलमानाकडे सापडलेल्या पीडित मुलीने देहली न्यायालयात दिलेल्या जबाबात या गुन्ह्यात अश्रफ मुजावर, वेंगुर्ला याचेही नाव घेतले. त्यामुळे या प्रकरणात आता २ मुसलमान सहभागी असल्याचे स्पष्ट !

गोवा : राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याच्या प्रकरणी नाझारियो डिसोझा यांच्या विरोधात गुन्हा नोंद

पोलिसांनी नाझारियो डिसोझा याला अन्वेषणासाठी बोलावले आहे. सामाजिक माध्यमातून गोव्यातील आर्चबिशप यांचा अवमान केल्याच्या प्रकरणी नाझारियो डिसोझा याच्या विरोधात यापूर्वी एकदा गुन्हा नोंदवला गेला आहे.