मुंबईत लोकलमध्ये अश्‍लील नृत्‍य करणार्‍या तरुणीच्‍या व्‍हिडिओवर मुंबईकर संतापले

मुंबई – लोकलमध्ये एका तरुणीचा ‘बेली डान्‍स’ नावाचा अश्‍लील नृत्‍यप्रकार करतांनाचा व्‍हिडिओ प्रसारित होत आहे. प्रसिद्धी मिळवण्‍यासाठी तरुण-तरुणी अशा प्रकारच्‍या गोष्‍टी हल्ली मोठ्या प्रमाणात करतात; परंतु या व्‍हिडिओवर मुंबईकरांनी जोरदार संतप्‍त प्रतिक्रिया दिल्‍या आहेत.

मुंबईची लोकल ट्रेन हा त्‍यांचा श्‍वास असतो. त्‍यांच्‍या आयुष्‍याचा मोठा भाग यात व्‍यतित होतो. येथे श्री गणेशाची स्‍थापना करण्‍यापासून हळदी कुंकवापर्यंत आणि भजनांपासून गरब्‍यापर्यंत अनेक गोष्‍टी केल्‍या जातात. अगदी वाढदिवस, ओटी भरणे, नवरात्र आदी साजरे करणे, भाजी निवडणे आदी सर्व येथे केले जाते. असे असतांना अशा प्रकारचे अश्‍लील नृत्‍य करण्‍याला मुंबईकरांनी जोरदार विरोध केला आहे.