
मुंबई – महाराष्ट्रात महायुतीचे शासन स्थापनेला १०० दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राज्यशासनाने पुढील १०० दिवसांचे कार्यक्रम घोषित केले आहेत. शासनाच्या या कार्यक्रमांवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून लक्ष ठेवण्यात येणार आहे. याविषयी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत याचे नियोजन करण्यात आले. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पत्रकार परिषद घेऊन याविषयीची माहिती दिली.
या बैठकीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष वाढीसाठी पक्षाच्या नेत्यांना जिल्ह्यांचे दायित्व विभागून देण्यात आले आहे. पुढील ३ मासांत या नेत्यांनी आपापल्या भागांचा दौरा करून त्याविषयीचा अहवाल पक्षाला सादर करावयाचा आहे, अशी माहिती खासदार अमोल कोल्हे यांनी दिली.