मागील (२७ जानेवारी या दिवशीच्या) भागात श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या सत्संगाच्या वेळी घेतलेल्या आध्यात्मिक मुलाखतीपर्यंतचे सूक्ष्म परीक्षण पाहिले. या भागात श्री. निषाद देशमुख यांना ईश्वराने लक्षात आणून दिलेली श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये दिली आहेत.
(भाग ३)
लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा- https://sanatanprabhat.org/marathi/878043.html

८. श्रीसत्शक्ति(सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची ईश्वराने लक्षात आणून दिलेली काही आध्यात्मिक वैशिष्ट्ये
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ श्रीसत्शक्ति(सौ.) सिंगबाळ यांची मुलाखत घेत असतांना समष्टीला त्यांची अनेक आध्यात्मिक वैशिष्ट्ये सांगत होत्या. तेव्हा ईश्वर सूक्ष्मातून मलाही श्रीसत्शक्ति(सौ.) सिंगबाळ यांची काही आध्यात्मिक वैशिष्ट्ये सांगत होता. तेव्हा ‘श्रीसत्शक्ति(सौ.) सिंगबाळ यांची दैवी वैशिष्ट्ये समष्टीला कळावी’, अशी ईश्वराची इच्छा आहे’, असे मला वाटले. ईश्वराने मला श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांची सांगितलेली आध्यात्मिक वैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
८ अ. जन्मापासून दैवी बालिका असलेल्या श्रीसत्शक्ति(सौ.) सिंगबाळ ! : श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ जन्मापासूनच दैवी बालिका आहेत. त्यांनी साधना करण्यासाठी उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवरील सात्त्विक कुटुंबात जन्म घेतला. त्या दैवी बालिका असल्याने जन्मतः त्यांच्यात व्यष्टी साधनेसाठी पूरक असे अनेक गुण होते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी या व्यष्टी गुणांचे समष्टी गुणांमध्ये रूपांतर केले.

८ आ. अप्रगट भाव साधनेची अखंडता दर्शवणे, तर प्रगट भाव इतरांमध्ये भावजागृती करणे आणि व्यष्टी अन् समष्टी साधना करणार्यांमध्ये हे दोन्ही भाव असणे : या वार्तालापात श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संदर्भात बोलत असतांना मला सूक्ष्मातून त्यांच्या आध्यात्मिक हृदयाच्या (अनाहतचक्राच्या) ठिकाणी पुष्कळ मोठ्या प्रमाणात निळसर रंग आणि त्यात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दर्शन होत होते. त्यांच्या बोलण्यातून भावाची स्पंदने मोठ्या प्रमाणात प्रक्षेपित होऊन सर्वत्रच्या समष्टीकडे जात होती.
या संदर्भात ईश्वराने मला सांगितले, ‘जीव काही काळासाठी किंवा चित्तातून त्याच्या इष्टाशी एकरूप होतो, तेव्हा त्याच्या (जिवाच्या) प्रकृतीनुसार त्याच्यात अप्रगट आणि प्रगट दोन्ही भावस्थिती निर्माण होतात. व्यष्टी आणि समष्टी साधना करणार्यांमध्ये दोन्ही भाव असतात. ‘अप्रगट भावाचे कार्य साधनेची अखंडता, तर प्रगट भावाचे कार्य इतरांमध्ये भावजागृती करणे’, असे असते.’ या स्थितीतील हनुमंताचे वर्णन करत गोस्वामी तुलसीदास लिहितात,
‘विद्यावान गुणी अति चातुर ।
रामकाज (रामकार्य) करने को आतुर ।। ’
अर्थ : (हनुमंत) विद्यावान, गुणी आणि चातुर्ययुक्त आहे. असे असूनही तो सतत रामकार्य करण्यास उत्सुक असतो.
८ इ. अप्रगट भावामुळे हनुमंताप्रमाणे सतत कार्यरत रहाणार्या, तर कार्यानुसार भाव प्रगट करण्याची दिव्य क्षमता असलेल्या श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ ! : श्रीरामाप्रती असलेल्या अनन्य भक्तीमुळे हनुमंतामध्ये अप्रगट आणि प्रगट दोन्ही स्वरूपातील भाव कार्यरत असतो. हनुमंतातील अप्रगट भावामुळे त्याला कठीण आणि अशक्य असे रामकार्य करणेही शक्य होत होते, तर त्याच्यातील प्रगट भावामुळे त्याला श्रीरामाच्या राजसभेत उपस्थित सर्वांसमोर आपली छाती फाडून त्यात श्रीराम अन् सीता यांचे दर्शनही करवता आले.

तशीच क्षमता श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्यात आहे. हनुमंताप्रमाणे श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या मनातही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी अनन्य भक्ती आहे. त्यामुळे त्यांच्या आध्यात्मिक हृदयात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा सतत निवास असतो. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ मुळात भक्तीयोगी आहेत. त्यामुळे जन्मापासून त्यांच्यात ईश्वराप्रती अप्रगट भाव होता. हा अप्रगट भाव त्यांची सेवा, विचार आणि मार्गदर्शन यांतून कार्यरत व्हायचा. समष्टी संत झाल्यावर त्यांच्यातील अप्रगट भावाला प्रगट भावाची जोड मिळाली. समष्टीला श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ घेत असलेल्या भक्तीसत्संगातून या प्रगट भावाची प्रचीती येते. हनुमंताप्रमाणे सतत अप्रगट भावात राहून समष्टी कार्य करणे आणि प्रगट भावाच्या माध्यमातून सर्वत्रच्या समष्टीची भावजागृती करण्याचे दिव्य कार्य करणे, त्यांना शक्य होत आहे.
८ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती असलेल्या अनन्य आणि निष्काम भक्तीमुळे व्यष्टी प्रकृतीचा त्याग करून गुरुकृपायोगानुसार समष्टी साधना करणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ ! : या सत्संगात श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी सांगितले, ‘‘पूर्वी मी अबोल होते. नंतर ‘सेवा करतांना मी बोलकी कशी झाले ?’, हे मलाही कळले नाही.’
या संदर्भात ईश्वराने मला सांगितले, ‘ज्ञानयोग, भक्तीयोग आणि कर्मयोग हे व्यष्टी साधनेद्वारे ईश्वरप्राप्तीचा मार्ग दाखवणारे योगमार्ग आहेत, तर गुरुकृपायोग हा समष्टी साधनेद्वारे ईश्वरप्राप्तीचा मार्ग दाखवणारा योगमार्ग आहे.’ अधिकतर दैवी बालकांनी ज्ञानयोग, भक्तीयोग आणि कर्मयोग यांपैकी एखाद्या मार्गाद्वारे मागच्या जन्मात साधना केलेली असते. यामुळे त्यांना गुरुकृपायोगानुसार साधना करणे कठीण होते. ते त्यांच्या योगमार्गानुसार साधना करण्यास प्राधान्य देतात. यामुळे त्यांची आध्यात्मिक प्रगती तुलनेने हळू होते. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ मुळात भक्तीयोगी होत्या; पण श्री गुरूंच्या प्रती असलेल्या निष्काम भक्तीमुळे त्यांनी त्यांची व्यष्टी प्रकृती आणि योगमार्ग यांचाही त्याग केला. त्यामुळे त्यांच्यात ज्ञान, भक्ती आणि कर्म यांचा सुवर्ण संगम होऊन त्या समष्टी संत झाल्या.
हनुमंत रूद्रावतार (शिवाचा अंश) असूनही त्याने केलेल्या श्रीरामाच्या भक्तीमुळे त्याच्यात श्रीविष्णूचे तत्त्व अधिक प्रमाणात आहे. तसेच श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचे आहे. त्या मुळात भक्तीयोगी असल्या, तरी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या निरंतर आज्ञापालनामुळे त्या ‘गुरुकृपायाेगी’ (गुरुकृपायोगानुसार साधना करणार्या) साधक झाल्या. त्यामुळे गुरुकृपायोगानुसार सर्व जिवांसाठी त्यांचे चरित्र आदर्श आणि मार्गदर्शक आहे.
८ उ. शिष्य आणि गुरु यांची अद्वैतावस्था सतत अनुभवणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ : या मुलाखतीत श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्यात ‘शिष्य’ आणि ‘गुरु’ अशी दोन्ही रूपे कार्यरत होती.
या संदर्भात ईश्वराने मला सांगितले, ‘जिवाचा आध्यात्मिक साधनाप्रवास ‘मुमक्षू ते जिज्ञासू, जिज्ञासू ते साधक, साधक ते शिष्य, शिष्य ते संत, संत ते गुरु’ असा होतो. या प्रकारे जीव अनेकातून एकात आलेला असतो. असे असले, तरी गुरुपदावरही गुरु आणि शिष्य अशी द्वैतावस्था रहाते. व्यष्टी साधना शिकवणारे गुरु देहत्याग झाल्यावर या स्थितीतून मुक्त होतात; पण समष्टी संतांचे तसे नसते. समष्टी संत समष्टीचे गुरु असल्याने ते एकाच वेळी ‘शिष्य’ आणि ‘गुरु’ या दोन्ही स्तरांवर म्हणजे अद्वैतात असतात. ‘शिष्यावस्थेत राहून अध्यात्मातील नवीन नवीन सूत्रे विविध जिवांमध्ये दडलेल्या गुरुस्वरूपातून शिकणे किंवा प्रत्यक्ष अनुभूतीतून शिकणे आणि गुरु बनून ती समष्टीला शिकवणे’, अशी शिष्य अन् गुरु यांतील अद्वैतावस्था ते अनुभवत असतात.’ याच टप्प्यावर श्रीसत्शक्ति(सौ.) सिंगबाळ, श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ आणि अन्य समष्टी सद्गुरु (सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव, सद्गुरु स्वाती खाडये, सद्गुरु अनुराधा वाडेकर, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे इत्यादी) आहेत. अन्य सद्गुरूंमधील ही अद्वैत स्थिती कार्यानुरूप पालटत असते, तर श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ ही अद्वैतावस्था सतत अनुभवत असतात. यामुळे त्या एकाच वेळी शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती या सर्व स्तरांवर असतात.
८ ऊ. व्यष्टी आणि समष्टी दोन्ही स्तरांवर आदर्श आध्यात्मिक जीवन जगणार्या एकमेवाद्वितीय श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ ! : काळानुसार व्यष्टी आणि समष्टी साधनेसाठी अनेक दैवी जीव भूलोकात जन्म घेतात. अशा जिवांना कलियुगात साधनेसाठी पूरक असे आध्यात्मिक वातावरण मिळत नाही. त्यामुळे मायेतील मानसिक आणि बौद्धिक मार्गदर्शनामुळे काही जीव साधना सोडून मायेकडे वळून स्वतःची अधोगती करून घेतात, तर काही जीव अधिक वेळ संसाराचे गाडे ओढण्यात घालवून अंतर्मनावरील साधनेच्या संस्कारांमुळे जन्मभर थोडीफार व्यष्टी साधना करून त्याच आध्यात्मिक पातळीला रहातात. काही जीव व्यष्टी जीवनात दु:ख आले; म्हणून देवाला शरण जाऊन साधनेकडे वळतात. श्रीसत्शक्ति(सौ.) सिंगबाळ यांचे (जीवन) या सर्वांहून वेगळे आहेत. त्यांनी मायेतील मानसिक आणि बौद्धिक मार्गदर्शन घेतले अन् त्यांत त्या यशस्वीही झाल्या, तरीही त्यांनी अध्यात्माची वाट धरली. त्यातही त्यांनी त्यांचे व्यष्टी आणि समष्टी जीवन वेगवेगळे न ठेवता व्यष्टी आणि समष्टी दोन्ही स्तरांवर त्या आदर्श आध्यात्मिक जीवन जगत आहेत. त्यांच्या आदर्श आध्यात्मिक जीवनामुळे त्यांचे कुटुंबीयही साधनामार्गी होऊन त्यांनीही उच्च आध्यात्मिक स्तर प्राप्त केले आहेत. व्यष्टी आणि समष्टी दोन्ही स्तरांवर आदर्श आध्यात्मिक जीवन जगणार्या त्या एकमेवाद्वितीय (ज्यांचा सारखा अन्य कोणीही नाही, अशा) आहेत. त्यामुळे आता जन्म घेतलेले सर्व दैवी बालक आणि पुढे येणारे लक्षावधी दैवी बालक यांच्यासाठी त्यांचे पूर्ण जीवनचरित्र आदर्श आणि पथदर्शक (मार्गदर्शक) आहे.
८ ए. ऋषिमुनी आणि महर्षि यांनी सूक्ष्मातून श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे चरित्र लिहिणे : मला वरील ज्ञान मिळत असतांना मला सूक्ष्मातून अनेक ऋषिमुनी आणि महर्षि वेदांप्रमाणे मोठ-मोठे ग्रंथ लिहितांना दिसले. या संदर्भात ईश्वराने मला सांगितले, ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे चरित्र समष्टीसाठी आदर्श आहे. त्यांचे जीवनरहस्य, त्यांच्या जीवनातील घडामोडी आणि त्यांत दडलेले अध्यात्मशास्त्र यांचे संकलन करण्याची क्षमता सर्वसामान्य साधक किंवा शिष्य यांच्यात नाही. त्यामुळे सूक्ष्मातून स्वतः ऋषिमुनी आणि महर्षि त्यांच्या चरित्रांचे लिखाण करत आहेत. ‘स्वतः ऋषिमुनी आणि महर्षि यांनी श्रीसत्शक्ति(सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या चरित्राचे लिखाण करणे’, हीच सूक्ष्म विश्वातील एक दैवी घटना आहे. काळानुसार समष्टीसाठी हे लिखाण अध्यात्मातील अधिकारी जिवांच्या माध्यमातून स्थुलातून प्रगट होणार आहे.
(‘वरील सर्व लिखाण करतांना ब्रह्मांड पोकळीतून श्वेत प्रकाश माझ्याकडे येत होता. तेव्हा फारसा विचार न करता माझ्याकडून आपोआप लिखाण होत होते. ‘श्वेत प्रकाशातून मिळणार्या शक्तीमुळे माझ्याकडून लिखाण होत असून पूर्ण लिखाण करतांना माझे देहभानही अल्प झाले आहे’, असे मला जाणवत होते.’ – श्री. निषाद)
९. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचे पती सद्गुरु नीलेश सिंगबाळ आणि सुपुत्र श्री. श्रीहरि सिंगबाळ यांनी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांची गुणवैशिष्ट्ये अन् आध्यात्मिक वैशिष्ट्ये सांगितल्यावर कार्यक्रमस्थळी सत्ययुगाचे वायूमंडल निर्माण होणे
या संतसत्संगात श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचे पती सद्गुरु नीलेश सिंगबाळ दूरभाषद्वारे, तर त्यांचे सुपुत्र श्री. श्रीहरि सिंगबाळ प्रत्यक्ष उपस्थित होते. सद्गुरु नीलेश सिंगबाळ आणि श्री. श्रीहरि सिंगबाळ श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांची गुणवैशिष्ट्ये अन् आध्यात्मिक वैशिष्ट्ये सांगत असतांना कार्यक्रमस्थळी सत्ययुगाचे वायूमंडल निर्माण झाले.
या संदर्भात ईश्वराने सांगितले, ‘सत्ययुगात जीव आध्यात्मिक स्थितीत असायचे. त्यामुळे ते जीव इतर जिवांचा देह, प्रकृती, नाते यांनुसार किंवा स्वतःचे स्वभावदोष आणि अहं यांनुसार न वागता त्या जिवांच्या आध्यात्मिक स्थितीनुसार त्यांच्याशी आचरण करायचे, म्हणजे आध्यात्मिक स्तरावर त्यांच्याशी वागायचे. सद्गुरु नीलेश सिंगबाळ आणि श्री. श्रीहरि सिंगबाळ हेही श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्याशी अनुक्रमे पत्नी अन् आई अशा भावनिक नात्यांनी न वागता त्यांच्यात ‘गुरुस्वरूपच’ पहात आहेत, उदा. श्री. श्रीहरि सिंगबाळ यांनी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्याकडून आईसारखी अपेक्षा न करता त्यांना सेवेत यथाशक्ती साहाय्य केले, तर सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना ‘सद्गुरु ताई’, असे संबोधित केले. ते व्यष्टी आणि समष्टी साधनेच्या संदर्भात त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतात. सद्गुरु नीलेश सिंगबाळ आणि श्री. श्रीहरि सिंगबाळ यांच्या अशा आध्यात्मिक आचरणातून प्रक्षेपित होणारी उच्च कोटीची सात्त्विकता आणि चैतन्य यांमुळे कार्यक्रमस्थळाचे वायूमंडल सत्ययुगाप्रमाणे झाले.’
(क्रमशः)
या लेखातील पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/878755.html
– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान, वर्ष २०२४ ची आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), फोंडा, गोवा.
सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.
सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात. |