हिंदु जनजागृती समितीकडून आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्रीमहंत रवींद्र पुरीजी यांचा सन्मान !

श्रीमहंत रवींद्र पुरीजी यांचा सन्मान करतांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी महाकुंभक्षेत्री ‘अखिल भारतीय आखाडा परिषदे’चे अध्यक्ष श्रीमहंत रवींद्र पुरीजी यांची नुकतीच भेट घेतली. या मंगलप्रसंगी सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी श्रीमहंत रवींद्र पुरीजी यांचा पुष्पहार आणि भेटवस्तू देऊन सन्मान केला, तर श्रीमहंत रवींद्र पुरीजी यांनी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे अन् हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांचा प्रसाद स्वरूप वस्त्र देऊन आणि श्री दत्तात्रेयाच्या मूर्तीचे छायाचित्र भेट देऊन सन्मान केला. या प्रसंगी सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी समितीच्या वतीने गोवा राज्यात प्रतिवर्षी आयोजित होणार्‍या वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवाला उपस्थित रहाण्यासाठी त्यांना निमंत्रित केले.

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, सद्गुरु नीलेश सिंगबाळ आणि श्री. सुनील घनवट यांचा सन्मान करतांना श्रीमहंत रवींद्र पुरीजी

समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड या राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट हेसुद्धा या मंगलप्रसंगी उपस्थित होते. श्रीमहंत रवींद्र पुरीजी यांनी त्यांना, ‘हिंदु जनजागृती समितीचे कार्य आम्हाला ठाऊक आहे’, असे सांगितले.