हिंदु जनजागृती समितीचे प्रदर्शन परिपूर्ण आणि प्रभावी ! – पाकिस्तानी हिंदूंसाठी लढणारे डॉ. ओमेंद्र रत्नू

हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन केसरी, प्रदर्शन पहातांना डॉ. ओमेंद्र रत्नू, सद्गुरु नीलेश सिंगबाळ

प्रयागराज, ३० जानेवारी (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या कक्षाला पाकिस्तानी हिंदूंसाठी लढणार्‍या ‘निमित्तेकम’ संस्थेचे डॉ. ओमेंद्र रत्नू यांनी भेट दिली. या वेळी त्यांनी हिंदु साधू-संत, बांगलादेशी हिंदू यांच्यावर होणार्‍या अत्याचारांविषयीची माहिती फलक प्रदर्शनात पाहिल्यानंतर त्यांना प्रदर्शन पुष्कळ आवडले. हिंदु जनजागृती समितीचे प्रदर्शन परिपूर्ण आणि प्रभावी आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांनी प्रदर्शनाचा व्हिडिओ बनवून त्यांच्या परिचितांना पाठवला, तसेच त्यामध्ये कक्षाला भेट देण्याचे आवाहनही केले. या वेळी त्यांच्या समवेत त्यांचे बंधू श्री. अंबिकेश रत्नू उपस्थित होते. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ, हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वोत्तर भारत राज्य समन्वयक श्री. शंभू गवारे हे उपस्थित होते. डॉ. ओमेंद्र रत्नू हे विस्थापित हिंदु आणि शीख यांना कुंभनगरीत प्रवास घडवून आणण्यासाठी आले आहेत.

‘निमित्तेकम’ या त्यांच्या संस्थेच्या नावाविषयी डॉ. ओमेंद्र रत्नू यांनी सांगितले की, मी पाक येथील हिंदूंसाठी, त्यांना सुरक्षित भारतात आणण्यासाठी निमित्तमात्र म्हणून प्रयत्न करत आहे. परमेश्‍वरच माझ्याकडून हे कार्य करून घेत आहे. यामुळे मी संस्थेचे नाव ‘निमित्तेकम’ असे ठेवले आहे.