Goa Rental Vehicles Accidents : गोव्यात भाडेतत्त्वावर वाहने घेतांना वाहतूक नियमांच्या हमीपत्रावर स्वाक्षरी आवश्यक !

गोव्यात होणारे अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलीस विविध पातळीवर प्रयत्न करत आहेत. या अपघातांची नेमकी कारणे काय, याचाही अभ्यास केला जात आहे. हे हमीपत्र भरून घेण्याचे उत्तरदायित्व व्यावसायिकाकडे असेल.

जैसलमेर (राजस्थान) येथील वाळवंटात ‘तेजस’ हे लढाऊ विमान कोसळले !

जैसलमेर येथील वाळवंटात भारताचे संपूर्ण स्वदेशी बनावटीचे ‘तेजस’ हे लढाऊ विमान कोसळले. यातील दोन्ही वैमानिक सुखरूप आहेत. हे लढाऊ विमान पडल्यानंतर त्याला आग लागली. यात २ वैमानिक होते.

गोवा : वास्को येथील सरकारी व्यायामशाळेचे ‘फॉल्स सिलिंग’ कोसळले !

सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. या घटनेनंतर या व्यायामशाळेत येणार्‍यांमध्ये भीती पसरली आहे.

शाळेतील सुरक्षिततेच्या नियमांविषयी महापालिका प्रशासनाचे विभाग अनभिज्ञ !

सुरक्षिततेच्या मूलभूत नियमांकडे दुर्लक्ष करणार्‍या शाळेवर कठोर कारवाईच व्हायला हवी ! शाळेला विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने जाणीव करून देणे, हे शाळेसाठी लज्जास्पद आहे !

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : १३ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांकडे दुर्लक्ष करू नका ! – मानसोपचार तज्ञ; आचार्य विद्यासागर महाराज यांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या गाडीचा अपघात !…

गेल्या १० वर्षांत १३ ते १८ वर्षे वयोगटातील मुला-मुलींमध्ये प्रेमप्रकरण, व्यसनाधीनता, नैराश्य आणि त्यातून आत्महत्येचे वाढणारे प्रमाण हे चिंताजनक असून यात दुपटीपेक्षाही अधिक वाढ झाली आहे

अपघातग्रस्तांना हानीभरपाई मिळण्यासाठी ‘मोटर वाहन कायद्या’विषयी जनजागृती आवश्यक !

केंद्र आणि राज्य सरकार अनेक चांगल्या योजना घोषित करते. त्यावर पुष्कळ पैसाही व्यय होतो; परंतु निरुत्साही आणि कामचुकार यंत्रणा त्याविषयीची माहिती जनतेपर्यंत पोचवत नाहीत.

ससून रुग्णालयात लागलेल्या आगीचा धोका टळला !

वॉर्डमधील रुग्ण सुखरूप असून रुग्णालयातील आग पूर्णपणे विझली आहे. यामध्ये कुणी घायाळ झाले नाही, तसेच जीवितहानी झाली नाही. शौचालयात अज्ञात व्यक्तीने धूम्रपान केल्याने आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Cracker Factory Fire : हरदा (मध्यप्रदेश) येथे फटाक्यांच्या अवैध कारखान्यातील स्फोटामुळे ८ जणांचा मृत्यू

६० हून अधिक जण घायाळ !

रायगड जिल्ह्याचे भाजपचे उपाध्यक्ष निळकंठ घरत यांचे निधन

शोभीवंत फुग्यामध्ये हवा भरत असतांना त्याचा स्फोट होऊन घरत घायाळ झाले होते. यात ते ६० ते ७० टक्के भाजले.

जालना येथे जाणारा गॅस टँकर अचानक उड्डाणपुलाच्या दुभाजकावर चढला !

जालना येथे जाणारा एक गॅस टँकर अचानक उड्डाणपुलाच्या दुभाजकावर चढला. त्यामुळे टँकरचे २ व्हॉल्व्ह उघडले असून त्यातून गॅस गळती होत आहे. येथील सिडको बसस्थानक भागात टँकरमधून गॅस गळती होत असल्याने आणीबाणी उद्भवली आहे.