ससून रुग्णालयात लागलेल्या आगीचा धोका टळला !

वॉर्डमधील रुग्ण सुखरूप असून रुग्णालयातील आग पूर्णपणे विझली आहे. यामध्ये कुणी घायाळ झाले नाही, तसेच जीवितहानी झाली नाही. शौचालयात अज्ञात व्यक्तीने धूम्रपान केल्याने आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Cracker Factory Fire : हरदा (मध्यप्रदेश) येथे फटाक्यांच्या अवैध कारखान्यातील स्फोटामुळे ८ जणांचा मृत्यू

६० हून अधिक जण घायाळ !

रायगड जिल्ह्याचे भाजपचे उपाध्यक्ष निळकंठ घरत यांचे निधन

शोभीवंत फुग्यामध्ये हवा भरत असतांना त्याचा स्फोट होऊन घरत घायाळ झाले होते. यात ते ६० ते ७० टक्के भाजले.

जालना येथे जाणारा गॅस टँकर अचानक उड्डाणपुलाच्या दुभाजकावर चढला !

जालना येथे जाणारा एक गॅस टँकर अचानक उड्डाणपुलाच्या दुभाजकावर चढला. त्यामुळे टँकरचे २ व्हॉल्व्ह उघडले असून त्यातून गॅस गळती होत आहे. येथील सिडको बसस्थानक भागात टँकरमधून गॅस गळती होत असल्याने आणीबाणी उद्भवली आहे.

देहलीतील कालकाजी मंदिरात व्यासपीठ कोसळल्याने झालेल्या चेंगराचेंगरीत १ जण ठार, तर १५ भाविक घायाळ !

प्रसिद्ध कालकाजी मंदिरात जागरणाच्या कार्यक्रमासाठी तात्पुरते व्यासपीठ उभारण्यात आले होते. त्यावर पुष्कळ लोक चढल्याने ते कोसळले

समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात ३ प्रवासी ठार !

जिल्ह्यातील वाठोना शिवणी येथे समृद्धी महामार्गावर २५ जानेवारीच्या पहाटे ५ वाजता एका ट्रॅव्हल्सची कंटेनरला धडक बसून झालेल्या अपघातात ३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

गतिरोधक : अपघात रोखणारे कि घडवणारे ?

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने वाहनांच्या गतीवर नियंत्रण रहाण्यासाठी रस्त्यांवर जागोजागी गतिरोधक बसवण्यात येतात; मात्र बेशिस्त वाहनचालक, नियमांचे पालन न करणे, वेगाने गाडी चालवणे,..

वैनगंगा नदीत ८ महिला बुडाल्या !

नदीपात्राच्या मधोमध आल्यानंतर डोंगा (लहान होडी) उलटला. त्यात बसलेल्या ८ महिला नदीपात्रात बुडाल्या.

Atal Setu : ‘अटल सेतू’वर पान किंवा गुटखा खाऊन थुंकल्याच्या खुणा आढळल्या !

स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही राजकारण्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचा परिणाम ! सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यासारख्या घटना घडणे विश्‍वगुरुपदाकडे वाटचाल करणार्‍या भारतासाठी लज्जास्पद !

Afghanistan Plane Crash : अफगाणिस्तानात कोसळलेले विमान भारताचे नाही ! – भारत

अफगाणिस्तानच्या प्रसारमाध्यमांनी हे विमान भारताचे असल्याचे वृत्त प्रसारित केले होते; मात्र भारत सरकारकडून तातडीने स्पष्टीकरण देण्यात आले.