Rahul Gandhi On Mahakumbh Stampede : (म्हणे) ‘गैरव्यवस्थापन आणि मान्यवरांना प्राधान्य यांमुळे चेंगराचेंगरी !’

प्रयागराज कुंभपर्व २०२५

राहुल गांधी यांचा आरोप

काँग्रेसचे नेते राहुल गांधी

नवी देहली – प्रयागराज महाकुंभात चेंगराचेंगरीत अनेक लोकांचा मृत्यू आणि अनेक जण घायाळ झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. मी शोक करणार्‍या कुटुंबांप्रती मनापासून सहानुभूती व्यक्त करतो आणि घायाळ लवकर बरे होण्याची आशा करतो. या दुःखद घटनेला गैरव्यवस्थापन आणि सामान्य भाविकांपेक्षा मान्यवरांच्या (व्हीआयपी) हालचालींवर प्रशासनाचे विशेष लक्ष उत्तरदायी आहे.

महाकुंभ अजून बरेच दिवस चालणार आहे, अजून बरेच महास्नान होणार आहेत. आजच्यासारखी दुर्दैवी घटना पुन्हा घडू नये; म्हणून सरकारने व्यवस्था सुधारली पाहिजे. ‘व्हीआयपी संस्कृती’ला आळा घालायला हवा आणि सरकारने सामान्य भाविकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी चांगल्या व्यवस्था कराव्यात, अशी पोस्ट करत काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरोप केला आहे.

संपादकीय भूमिका

अमृतस्नानाच्या वेळी कोणते मान्यवर आले होते आणि प्रशासन त्यांची कोणती सोय करत होते ? अमृतस्नानाच्या वेळी झालेली दुर्घटना ही दुर्दैवी आहेच; मात्र सवंग लोकप्रियतेसाठी राहुल गांधी यांनी असे फुकाचे आरोप करू नयेत, असेच हिंदूंना वाटते !