यवतमाळमध्ये शाळेच्या बसचा भीषण अपघात !

  • स्टिअरिंग रॉड तुटला

  • ९ वीतील विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

यवतमाळ – येथील उमरखेड तालुक्यात शाळेची बस झाडाला धडकून भीषण अपघात झाला. यात इयत्ता ९ वीतील विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर काही विद्यार्थी घायाळ झाले. त्यांच्यावर उमरखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत. ‘स्टुडंट वेल्फेअर’ या इंग्रजी माध्यमाच्या शाळेची ही बस होती. बसचा स्टिअरिंग रॉड तुटला असून चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा प्रकार घडला.