Pushpak Express Accident : पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याच्या अफवेमुळे प्रवाशांनी मारल्या उड्या : ११ प्रवाशांचा मृत्यू, तर ८ जण घायाळ

पाचोरा (जळगाव) येथील घटना

घटनास्थळ

जळगाव – येथील पाचोर्‍यापासून काही अंतरावरील परधाडे या स्थानकाजवळ  पुष्पक एक्सप्रेसच्या संदर्भात २२ जानेवारीला संध्याकाळी एक दुर्घटना घडली. डब्याच्या दारात बसलेल्या प्रवाशांना गाडीची चाके आणि रूळ यामधील ठिणग्या पाहून आग लागली असे वाटले. गाडीत ‘आग लागली’ अशी अफवा काही डब्यांत पसरली. त्यामुळे प्रवाशांंनी गाडी तेथे जवळच असलेल्या साखळी ओढून पुलावर थांबवली. या वेळी काही प्रवाशांनी डब्यातून बाहेर उड्या मारल्या. त्याच वेळी शेजारच्या रुळावर विरुद्ध दिशेने कर्नाटकहून देहलीकडे जाणारी ‘कर्नाटक एक्सप्रेस’ वेगाने आली. यामुळे त्याचा धक्का लागल्याने ११ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर ८ जण घायाळ झाले आहेत.

रुळाच्या दोन्ही बाजूला असलेल्या गावांतून गावकरी प्रवाशांच्या साहाय्याला धावले. या घटनेनंतर पुष्पक एक्सप्रेस काही काळ त्या ठिकाणीच थांबवण्यात आली. त्यामुळे भुसावळ आणि अन्य गाड्या त्यांच्या स्थानकावर थांबवण्यात आल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.