लातूर येथे महामार्गाच्या दुरवस्थेने त्रस्त नागरिकांचे ‘तिरडी’ आंदोलन !

तिरडी आंदोलन

निलंगा (जि. लातूर) – लातूर-जहीराबाद राष्ट्रीय महामार्गावरील भेगा पडलेल्या रस्त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे अनेकांना आपले प्राण गमावावे लागत आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मसलगा पाटी याठिकाणी तिरडी आंदोलन करण्यात आले. या वेळी आंदोलनकर्त्यांनी २ घंटे रस्त्यावर ठिय्या मांडून शासनाचा जाहीर निषेध केला आहे.

लातूर ते जहीराबाद राष्ट्रीय महामार्गावरील अपघातग्रस्तांना प्रशासनाने साहाय्य घोषित करून दुरवस्था झालेल्या रस्त्याची येत्या ४ दिवसांत दुरुस्ती करावी अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याची चेतावणी छावा संघटनेचे तुळशीदास साळुंखे यांनी दिली. या आंदोलनात मसलगा, गौर, मुगाव निटूर, कवठापाटी, आंबेगाव गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते.

संपादकीय भूमिका 

असे आंदोलन जनतेला का करावे लागते ? जनतेकडून कर घेणारे प्रशासन स्वतःहून यामध्ये लक्ष घालून जनतेला सुविधा का देत नाही ?