Lalu Yadav Calls Kumbh Useless : (म्हणे) ‘कुंभाला काही अर्थ नाही, ती फालतू गोष्ट !’

भाजप सत्तेत असल्याने लालू प्रसाद यादव अशा प्रकारे राजकारण करत आहेत. माजी रेल्वेमंत्री असल्याने या घटनेवरून आता खरेतर त्यांना त्यांचा हिंदुद्वेषाचा कंड शमवण्याची संधी मिळाली आहे, एवढेच !

मध्यप्रदेशात वायूदलाचे लढाऊ विमान ‘मिराज २०००’ कोसळले !

येथे भारतीय वायूदलाचे ‘मिराज २०००’ लढाऊ विमान कोसळले. त्यानंतर विमानाने पेट घेतला. या अपघातात विमानाचे दोन्ही वैमानिक घायाळ झाले.

Prayagraj MahaKumbh Stampede Inquiry : आतंकवादविरोधी पथकाचे १० सहस्र संशयितांवर बारीक लक्ष !

महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीचे प्रकरण अपघात नव्हे, तर त्यामागे कट असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात आतंकवादीविरोधी पथक आणि इतर सुरक्षायंत्रणा यांनी अनुमाने १० सहस्र संशयितांवर बारीक लक्ष ठेवले आहे.

Guidelines For Devotees : मौनी अमावस्येच्या दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर शासनाकडून भाविकांना घाटांवर न थांबण्याची सूचना !

मौनी अमावास्येच्या दिवशी कुंभमेळ्यात अमृतस्नानाच्या वेळी झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर ३ फेब्रुवारी असलेल्या अमृतस्नानाच्या दृष्टीने प्रशासनाकडून सावधगिरीची पावले उचलण्यात येत आहेत. स्नानासाठी त्रिवेणी संगमावर गर्दी होऊ नये, यासाठी नागरिकांनी त्रिवेणी संगमाऐवजी घाटांवर स्नान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे

Yogi Adityanath Prayagraj Kumbh Parva 2025 : संतांच्या धैर्यापुढे सनातन धर्मविरोधकांचा पराभव ! – मुख्यमंत्री योगी

संतांच्या प्रेरणेमुळे महाकुंभपर्व चालू झाल्यापासून १९ दिवसांत ३२ कोटींहून अधिक भाविकांनी गंगास्नान करून पुण्य प्राप्त केले आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

PIL – Prayagraj Stampede : महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या विरोधात जनहित याचिका प्रविष्ट !

महाकुंभमेळ्यात मौनी अमावस्येला पहाटे चेंगराचेंगरी झाली. त्यात ३० जणांना प्राण गमवावे लागले. या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे.

Mahakumbh Fire Again : कुंभमेळ्यात पुन्हा आग, १५ तंबू जळून खाक !

कुंभमेळ्यात सेक्टर २२ मध्ये आग लागून त्यात १५ तंबू जळून खाक झाले. यापूर्वीही सेक्टर १८ मध्ये आगीची घटना घडली होती. अग्नीशमन दलाने तत्परतेने आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही.

Mahakumbh Stampede : महाकुंभ दुर्घटना : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा न्यायालयीन चौकशीचा आदेश !

मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपयांचे साहाय्य घोषित !

US Plane Accident : अमेरिकेत प्रवासी विमान आणि सैन्याचे हेलिकॉप्टर यांची धडक

अमेरिकेचे एक प्रवासी विमान आणि सैन्याचे हेलिकॉप्टर यांची धडक होऊन दोन्ही ‘पोटोमॅक नदी’त कोसळले. यात १६ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून एकूण ६४ जण विमानात होते, तर हेलिकॉप्टरमध्ये ३ जण होते.

Rahul Gandhi On Mahakumbh Stampede : (म्हणे) ‘गैरव्यवस्थापन आणि मान्यवरांना प्राधान्य यांमुळे चेंगराचेंगरी !’

अमृतस्नानाच्या वेळी कोणते मान्यवर आले होते आणि प्रशासन त्यांची कोणती सोय करत होते ? अमृतस्नानाच्या वेळी झालेली दुर्घटना ही दुर्दैवी आहेच; मात्र सवंग लोकप्रियतेसाठी राहुल गांधी यांनी असे फुकाचे आरोप करू नयेत, असेच हिंदूंना वाटते !