आग विझवल्यावर ‘देवाची कृपा’ असे ‘फायर ब्रिगेड’ म्हणाले !

प्रयागराज महाकुंभमेळ्यात आग लागण्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेवर महाराष्ट्रातील पुरो(अधो)गाम्यांनी अध्यात्म, देव, कर्मकांड यांवर टीका केली नसती, तर नवलच होते; त्यांनी या दुर्घटनेवर केलेली काव्यरूपी टीका आणि त्यावर दिलेले खंडणात्मक प्रत्युत्तर येथे देत आहोत.

महाकुंभमेळ्यात सनातन संस्थेच्या प्रदर्शनांना आतापर्यंत ३० सहस्रांहून अधिक हिंदूंचा प्रतिसाद !

या दैवी वातावरणाचा खर्‍या अर्थाने लाभ होण्यासाठी आणि भाविकांना धर्मज्ञान प्रदान करण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने २ ठिकाणी ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांची प्रदर्शने लावली आहेत.

कुंभमेळा पहाण्याएवढेच महत्त्वाचे असलेले हिंदु जनजागृती समितीचे प्रदर्शन ! – जिज्ञासूचा अभिप्राय

कुंभमेळ्यातील सेक्टर ६ येथील हिंदु जनजागृती समितीचे प्रदर्शन १९ जानेवारीला उभे राहिले आणि त्याचे औपचारिक उद््घाटन करण्यापूर्वीच हिंदूंनी उत्स्फूर्तपणे प्रदर्शनाला भेट देणे चालू केले.

महाकुंभमेळ्यात पहिल्यांदाच अध्यात्मात संशोधन करणार्‍या महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचा प्रदर्शन कक्ष !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचा प्रदर्शन कक्ष या वर्षी कुंभमेळ्यामध्ये पहिल्यांदाच उभारण्यात आला आहे. मुख्य म्हणजे या प्रदर्शनाची माहिती घेण्यासाठी अनेक पत्रकार स्वतः भेट देऊन कार्य जाणून घेत आहेत.

संपादकीय : हिंदूंचे दुर्दैव !

हिंदिूंची लाखो वर्षांची परंपरा अखंडित तेवत ठेवणारा कुंभमेळा ! सध्या प्रयागराज येथे चालू असलेला मेळा १४४ वर्षांनी आल्याने तो ‘महाकुंभमेळा’ आहे. सूर्य आणि गुरु ग्रह यांच्या १४४ वर्षांमधून एकदा येत असलेल्या विशिष्ट राशींमधील संबंधांमुळे हा योग येत असतो….

सनातन संस्थेच्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा दैवी अन् ऐतिहासिक प्रयागराज दौरा !

‘पृथ्वीच्या प्रलयाच्या वेळी भगवान श्रीविष्णु याच अक्षय्यवटाच्या पानावर शिशुरूपात जाऊन वास करतात’, अशी मान्यता आहे. यासह ‘अक्षय्यवटाच्या केवळ दर्शनमात्रे मोक्षप्राप्ती होते’, अशीही हिंदूंची श्रद्धा आहे.

सद्गुरुद्वयींच्या महाकुंभमेळ्याच्या दिव्य दौर्‍याचे अनमोल क्षणमोती !

सद्गुरुद्वयींनी संत निवास, कार्यकर्ते निवास, वैशिष्ट्यपूर्ण अन्नपूर्णा कक्ष, कार्यालय, चिकित्सालय, प्रसिद्धी कक्ष, संत संमेलनाचा भव्य मंडप इत्यादी पाहून त्या मागील विचार समजून घेतला. ही भेट हिंदूऐक्याचा आविष्कार दर्शवणारी होती.

सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला सहस्रो हिंदूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कुंभमेळ्यात सनातन संस्थेच्या वतीने २ ठिकाणी ग्रंथ प्रदर्शन लावण्यात आले आहे. ही प्रदर्शने अनुक्रमे सेक्टर क्रमांक १९, मोरी मुक्ती मार्ग आणि सेक्टर क्रमांक ९ येथे लावण्यात आली आहेत.

‘सनातन, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि हिंदु राष्ट्र’, हाही दैवी त्रिवेणी संगमच !

ज्याप्रमाणे गंगा, यमुना आणि सरस्वती या त्रिवेणी संगमाचे महत्त्व कालातीत आहे, त्याप्रमाणे ‘सनातन, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि हिंदु राष्ट्र’, या दैवी त्रिवेणी संगमाचे महत्त्व युगानुयुगे राहील !

कुंभमेळ्याविषयी ‘बीबीसी’चा हिंदुद्वेष !

हीन आणि अश्लील कृत्याचे उदात्तीकरण अन् पाठीशी घालण्याचे काम ‘बीबीसी’सारखी वृत्तसंस्था करते. याउलट साधना आणि राष्ट्रकार्य करणार्‍या नागा साधूंवर मात्र टीका करते.