
आज सर्वत्र ‘सनातन’चा उद्घोष चालू आहे. महाकुंभक्षेत्री ‘सनातन’ हा शब्द पावलोपावली कानी पडत आहे. आज हिंदुत्वनिष्ठ संस्था, संघटना, धार्मिक- आध्यात्मिक संस्था आदी सर्वांच्याच मुखी ‘सनातन धर्म’, ‘सनातन राष्ट्र’, ‘सनातन
संस्कृती’, असे शब्द पदोपदी आहेत. ‘सनातन’ या शब्दाने हिंदूंना जणू एक नवी उभारी मिळत आहे. ‘सनातन संस्थे’चे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ३४ वर्षांपूर्वीच, म्हणजे वर्ष १९९० मध्ये ‘सनातन भारतीय संस्कृती संस्था’ या नावाने संस्थेची स्थापना करून जनमानसावर ‘सनातन’ शब्दाचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व बिंबवले. विशेष म्हणजे त्या काळी, म्हणजे ३४ वर्षांपूर्वी ‘सनातन’ म्हणजे ‘बुरसटलेले’ असा अर्थ रूढ होता. त्या काळी हा शब्द उच्चारणेही कमीपणाचे मानले जाई. कुणी त्याचा फारसा वापर करत नसत. त्यातच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘सनातन’चा खरा अर्थ समाजाला समजावून सांगितला. परिणामस्वरूप आज ‘सनातन’ हा शब्द हिंदूंच्या जीवनाचा अविभाज्य अंग
बनत चालला आहे. ‘हिंदूंच्या मनात आणि हृदयात ‘सनातन’चा झेंडा रोवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे या पृथ्वीवर लोककल्याणकारी हिंदु राष्ट्राचाही झेंडा रोवतील’, अशी सनातनच्या साधकांची दृढ श्रद्धा आहे !
ज्याप्रमाणे गंगा, यमुना आणि सरस्वती या त्रिवेणी संगमाचे महत्त्व कालातीत आहे, त्याप्रमाणे ‘सनातन, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि हिंदु राष्ट्र’, या दैवी त्रिवेणी संगमाचे महत्त्व युगानुयुगे राहील ! त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी
सद्गुद्वयींचा प्रयागराजचा दैवी दौरा, ही त्याचीच प्रचीती आहे. अशा महान तीन अवतारी गुरूंच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती थोडीच आहे !
– श्री. नीलेश कुलकर्णी, विशेष प्रतिनिधी, दैनिक सनातन प्रभात, प्रयागराज.