
कुंभमेळ्यातील सेक्टर ६ येथील हिंदु जनजागृती समितीचे प्रदर्शन १९ जानेवारीला उभे राहिले आणि त्याचे औपचारिक उद््घाटन करण्यापूर्वीच हिंदूंनी उत्स्फूर्तपणे प्रदर्शनाला भेट देणे चालू केले. हिंदूंनी गटागटाने या प्रदर्शनाला भेट दिली. महत्त्वाचे म्हणजे हे प्रदर्शन मुख्य रस्त्यापासून थोडे आत आहे आणि आसपास तेथील भूमीवर अन्य संप्रदायांचे मंडप नाहीत. तरीही हिंदु या ठिकाणी प्रदर्शन पहाण्यास येऊन गर्दी करत आहेत. हिंदु धर्मशास्त्रासह या प्रदर्शनात काश्मीरमधील हिंदूंवर झालेल्या अत्याचारांचे प्रदर्शन, बांगलादेशी हिंदूंवर होणारे अमानुष अत्याचार आणि त्यांची भयावह स्थिती दाखवणारे प्रदर्शन, भारतातील हिंदूंपुढील धोके यांविषयी प्रदर्शनात माहिती देणारे फलक लावलेले आहेत. हे फलक वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

प्रदर्शन कक्षाचे औपचारिक उद्घाटन झाल्यावर या प्रदर्शनाला ५ दिवसांत १ सहस्र ८०० हून अधिक लोकांनी भेटी दिल्या आहेत, तर २६० हून अधिक हिंदूंनी त्यांचे अभिप्राय दिले आहेत. या अभिप्रायांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय म्हणजे काहींनी सांगितले, ‘कुंभमेळा पहाण्याला जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व हे प्रदर्शन पहाण्याला आहे.’ एका पोलीस कर्मचार्याने हे प्रदर्शन पाहून त्यांच्या वरिष्ठ अधिकार्यांना प्रदर्शन पहाण्यास आणले.
– श्री. यज्ञेश सावंत, कुंभनगरी, प्रयागराज, उत्तरप्रदेश. (२१.१.२०२५)
‘अब एकही लक्ष्य हिंदु राष्ट्र’ या फलकाला उत्स्फूर्त प्रतिसाद
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कुंभनगरीत ठिकठिकाणी लावलेल्या ‘अब एकही लक्ष्य हिंदु राष्ट्र’ या मोठ्या होर्डिंग्जजवळ (फलकाजवळ) अनेक हिंदु धर्माभिमानी उभे राहून स्वत:चे घोषणा देतांना छायाचित्र काढतांना दिसतात. – श्री. यज्ञेश सावंत