कुंभमेळ्यात सनातन संस्थेच्या वतीने २ ठिकाणी ग्रंथ प्रदर्शन लावण्यात आले आहे. ही प्रदर्शने अनुक्रमे सेक्टर क्रमांक १९, मोरी मुक्ती मार्ग आणि सेक्टर क्रमांक ९ येथे लावण्यात आली आहेत. या ठिकाणी बंगाली, गुजराती, इंग्रजी, कन्नड या
भाषांच्या ग्रंथांना अधिक चांगला प्रतिसाद आहे. सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत हे प्रदर्शन असते. २४ जानेवारी या दिवशी ३० सहस्र ७०० हून अधिक जिज्ञासूंनी प्रदर्शनाचा लाभ घेतला आहे.