महाकुंभमेळ्यात पहिल्यांदाच अध्यात्मात संशोधन करणार्‍या महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचा प्रदर्शन कक्ष !

प्रदर्शन कक्षातील संशोधनविषयक फलक पहातांना भाविक आणि जिज्ञासू

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचा प्रदर्शन कक्ष या वर्षी कुंभमेळ्यामध्ये पहिल्यांदाच उभारण्यात आला आहे. मुख्य म्हणजे या प्रदर्शनाची माहिती घेण्यासाठी अनेक पत्रकार स्वतः भेट देऊन कार्य जाणून घेत आहेत. पत्रकार येथे लावलेल्या संशोधनाविषयी उत्सुकता दाखवत आहेत. वैशिष्ट्यपूर्ण, म्हणजे कुंभनगरीतील कामधेनूद्वार अगदी प्रदर्शन कक्षाच्या शेजारीच आहे आणि त्यांच्या कमानीवर महर्षींची मूर्ती आहे अन् त्याच्या शेजारीच महर्षींचे नाव असलेले प्रदर्शन हा ‘दुग्धशर्करायोग’ जुळून आला आहे.

प्रदर्शन कक्षातील संशोधनविषयक फलक पहातांना भाविक आणि जिज्ञासू

एका पोलीस अधिकार्‍याने प्रदर्शनाला भेट दिली आणि त्याने प्रदर्शनाचे चित्रीकरण केले. ते हे चित्रीकरण त्यांचे मित्र, अन्य सहकारी अशा विविध गटांत पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. प्रीतम नाचणकर

या प्रदर्शनाविषयी काही अभिप्रायांमध्ये लोकांनी सांगितले की, कुंभमेळ्यातील हे चांगले प्रदर्शन आहे. काही जणांनी कार्याशी जोडण्याची इच्छा व्यक्त केली. स्वामी नारायण संप्रदायाच्या संतांनी या प्रदर्शनाविषयी ‘अध्यात्माचे वैज्ञानिक परिभाषेत मांडणी करणारे हे प्रदर्शन चांगले आहे’, असे सांगितले. या प्रदर्शनाला भेट देणार्‍यांमध्ये पोलीस अधिकारी, डॉक्टर आणि प्राध्यापक अशा उच्च शिक्षित वर्गातील आहे. या प्रदर्शनाला आतापर्यंत २ सहस्र ४०० हून अधिक लोकांनी भेट दिली, तर ४५० हून अधिक अभिप्राय मिळाले आहेत. (२१.१.२०२५)

– श्री. प्रीतम नाचणकर, कुंभनगरी, प्रयागराज, उत्तरप्रदेश.