भारतियांनो, भारतातही उत्तरदायित्वाने आणि संवेदनशीलतेने वागल्यास ‘गौरवशाली भारताचे नागरिक’ म्हणून पात्र होऊ !
सर्व भारतवासियांनीच आत्मपरीक्षण करायला हवे. आपल्या देशाला आपल्याकडून काय अपेक्षित आहे, ते प्रथमतः आपण देशाला देण्याचा प्रयत्न करायला हवा.
सर्व भारतवासियांनीच आत्मपरीक्षण करायला हवे. आपल्या देशाला आपल्याकडून काय अपेक्षित आहे, ते प्रथमतः आपण देशाला देण्याचा प्रयत्न करायला हवा.
भारत देश खर्या अर्थाने स्वतंत्र होण्यासाठी लवकरात लवकर हिंदु राष्ट्र येऊ दे आणि हिंदु धर्माची स्थापना होऊ दे, तसेच भारताला खर्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद मिळू दे.
स्वदेशी भाषा, वेश आणि विचार यांची पुनर्स्थापना करूनच भारतीय प्रजासत्ताक राष्ट्र स्वतंत्र आणि स्थिर राहू शकेल, हे अटळ सत्य स्वीकारून अग्रेसर होण्याचा संदेश देण्यासाठीच हा ‘प्रजासत्ताक दिन’ येत असतो.’
‘प्रजासत्ताक’ या शब्दाचा अर्थ देशाचा प्रत्येक नागरिक ! प्रत्येक नागरिक हा देशाचा सत्ताधारी आहे. प्रजासत्ताक होण्यासाठी आम्ही संसदीय लोकशाही स्वीकारलेली आहे.
आज देशप्रेम हरवत चाललेले आहे. खर्या इतिहासाची ओळख तरुण पिढीला करून द्यायला हवी. केवळ १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दोन दिवशी देशप्रेम जागृत करायचे नसून ३६५ दिवस देशप्रेमाचे धगधगते अग्निकुंड प्रज्वलित रहायला हवे.
‘आमचा समाज आणि राष्ट्र चातुर्वर्ण्यावर अधिष्ठित आहे. ‘वसिष्ठ-राम’, ‘शंकराचार्य-सुधन्वा’, ‘चाणक्य-चंद्रगुप्त’, ‘विद्यारण्य-हरिहरबुक्क’, ‘समर्थ रामदास-शिवप्रभू (शिवाजी)’, ‘सिद्धेश्वर-करवीरचे शाहू’, अशा ब्राह्म आणि क्षात्रतेज यांचा समन्वय साधणारे आहे.
‘आतंकवादी आणि त्याला पाठिंबा, तसेच साहाय्य देणार्या लोकांना जाहीररीत्या फाशी दिली पाहिजे, असा दंडक (कायदा) केला पाहिजे.
‘ऋषि-मुनी आणि तपस्वी यांच्या साधनेमुळे भारत हे राष्ट्र विश्वगुरु झाले आणि भौतिक दृष्टीनेही परम ऐश्वर्यशाली झाले. अशा श्रेष्ठ राष्ट्राची निर्मिती करणार्या सर्व ऋषि-मुनींना आमचा सादर नमस्कार !
स्वयंभू हिंदु राष्ट्र असलेले भारतवर्ष हे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनले आणि ‘हिंदु राष्ट्र’ ही तेजस्वी संकल्पना झाकोळून गेली. सद्यस्थितीत राष्ट्राच्या संदर्भातील सर्व समस्यांवर एकच कायमस्वरूपी उत्तर आहे अन् ते म्हणजे, धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्र-स्थापना’ !
राष्ट्रीयतेच्या भावनेमागे जे तत्त्वज्ञान आहे, ते शुद्ध भारतीय तत्त्वज्ञान म्हणजे राष्ट्र हा अद्वैताचा विश्वात्मक भावनेवरील महत्त्वपूर्ण टप्पा होय.