दाभोलकर-पानसरे हे खटले केवळ राजकीय कारणांनी प्रेरित ! – डॉ. अमित थढानी, लेखक

जोपर्यंत एखाद्या फोडातील ‘पू’ बाहेर काढल्‍याविना रोगी बरा व्‍हायला आरंभ होत नाही, तसेच आतील घाण बाहेर काढल्‍याविना ही स्‍थिती सुधारणार नाही, याची जाणीव झाल्‍याने मी ‘दाभोलकर-पानसरे हत्‍या : तपासातील रहस्‍ये ?’ हे पुस्‍तक लिहिले.

पुस्तकातून विषयाला वाचा फोडण्याचा प्रयत्न ! – डॉ. भागवत कराड, केंद्रीय अर्थराज्यमंत्री

पुस्तकाचे लेखक डॉ. थढानी म्हणाले की, दाभोलकरांच्या हत्येत वापरलेले पिस्तुल हे नंतर ‘सीबीआय’च्या कस्टडीमध्ये आले होते. असे असतांना त्यांच्या कस्टडीतून ते बाहेर निघून कॉ. पानसरे हत्येमध्ये ते कसे काय वापरले जाते आणि पुन्हा कस्टडीत येऊन बसते ? हे सर्व षड्यंत्र आहे.

सरकारचे साक्षी-पुरावे संपल्‍याची सीबीआयची माहिती !

महाराष्‍ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्‍यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्‍या हत्‍या प्रकरणात केंद्रीय गुन्‍हे अन्‍वेषण विभागाने साक्षी पुरावे संपल्‍याचा अर्ज सादर केला आहे. त्‍यामुळे संशयितांचे म्‍हणणे (जबाब) नोंदवले जाणार असून त्‍यानंतर बचाव पक्षाला साक्षीदार सादर करता येतील.

दाभोलकर हत्‍या प्रकरणी सीबीआय अन्‍वेषणाचा अंतिम अहवाल १३ सप्‍टेंबरला न्‍यायालयात सादर होणार !

अंनिसचे कार्याध्‍यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्‍या प्रकरणात केंद्रीय गुन्‍हे अन्‍वेषण विभागाचे (सीबीआयचे) अन्‍वेषण अधिकारी एस्.आर्. सिंह यांची उलटतपासणी ५ सप्‍टेंबर या दिवशी पूर्ण झाली. अधिवक्‍त्‍या सुवर्णा वस्‍त यांनी सिंह यांची उलटतपासणी घेतली.

डॉ. दाभोलकर हत्येचे अन्वेषण भरकटण्याला त्यांचे कुटुंबीयच उत्तरदायी !

तथाकथित विवेकतावादी डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात खोटे साक्षीदार उभे केले जात आहेत आणि नवनवीन आरोपी उभे केले जात आहेत. अशा प्रकारे अन्वेषण भरकटले असतांना माध्यमांमध्ये कुठेही चर्चा होतांना दिसत नाही.

तथाकथित विवेकवादी डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात सनातन संस्थेचा नाहक बळी देण्याचा प्रयत्न चालू !

वर्ष २०१३ मध्ये तथाकथित विवेकवादी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली. त्यानंतर सनातन संस्थेवर आरोप करण्यात आले.

डॉ. दाभोलकर हत्‍येचे अन्‍वेषण भरकटण्‍याला त्‍यांचे कुटुंबीयच उत्तरदायी ! – चेतन राजहंस, राष्‍ट्रीय प्रवक्‍ते, सनातन संस्‍था

सनातन संस्‍थेच्‍या वतीने आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘डॉ. दाभोलकर हत्‍या प्रकरण : प्रचार आणि वास्‍तव’

(म्हणे) ‘डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणात सनातन संस्थेचे अध्यक्ष जयंत आठवले यांना अटक का केली जात नाही ?’- अविनाश पाटील, अंनिस

अन्वेषण यंत्रणांनी अजून कोणताही निष्कर्ष मांडला नसतांना अविनाश पाटील कशाच्या आधारे असे विधान करत आहेत ? कि त्यांना अन्वेषण यंत्रणांपेक्षा अधिक कळते ?

पुणे येथील विठ्ठल रामजी शिंदे पुलावरून अंनिसचा निर्धार मोर्चा !

महाराष्‍ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्‍थापक डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्‍या हत्‍येला २० ऑगस्‍ट या दिवशी १० वर्षे पूर्ण झाली. त्‍या निमित्त पुण्‍यात स्‍मृती जागर, मूक मोर्चा आणि विवेकी निर्धार मेळावा अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले होते.

पुरोगाम्यांचा दबाव आणि अन्वेषण यंत्रणांची हतबलता यांमध्ये अडकलेले दाभोलकरांच्या हत्येचे अन्वेषण !

२० ऑगस्ट २०१३, सकाळी साधारण ७.३० वाजताची वेळ ! महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य करणारे नास्तिकतावादी नेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली. एकीकडे पुरोगामी महाराष्ट्राच्या गळ्यातील ताईत असलेले आणि दुसरीकडे नेहमीच वादग्रस्त राहिलेले व्यक्तीमत्त्व !