दिवाळीमध्ये दुपटीहून अधिक तिकीटदर आकारून महाराष्ट्रात खासगी ‘ट्रॅव्हल्स’कडून प्रवाशांची आर्थिक लूट !

अशी लूट अन्य धर्मियांच्या सणांच्या वेळी झाली असती, तर प्रशासनाने असाच निष्काळजीपणा दाखवला असता का ? सरकारने यात लक्ष घालून असे अपप्रकार चालू देणार्‍या दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे !

‘एस्.टी.’च्या संपामुळे खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट !

प्रादेशिक परिवहन विभागाची डोळेझाक !, सांगली-कोल्हापूर २०० रुपये, तर कोल्हापूर-पुणे १ सहस्र रुपयांची आकारणी

प्रवासी हंगामात खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची केली जाणारी लूटमार तात्काळ थांबवावी !

उन्हाळी सुट्टी, तसेच लग्नसराई यांच्या निमित्ताने चालू होणार्‍या प्रवासी हंगामात खासगी वाहतूकदारांकडून प्रचंड भाडेवाढ करून प्रवाशांची लूटमार केली जाते. ही लूटमार रोखण्यासाठी शासनाच्या निर्णयात सुधारणा करून त्याची प्रवासी हंगाम चालू होण्यापूर्वी परिणामकारक आणि कठोर कार्यवाही करावी