मराठी कुटुंबाला मारहाण करणारा परप्रांतीय अखिलेश शुक्ला निलंबित ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
कल्याण येथे मराठी माणसांविषयी गरळ ओकत एका मराठी कुटुंबाला मारहाण करणार्या अखिलेश शुक्ला नावाच्या परप्रांतियाला ‘महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा’तून निलंबित केले आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २० डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत केली.