खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांच्या ‘ऑनलाईन’ तिकीटदरांवर नियंत्रण ठेवण्यास परिवहन विभाग अपयशी !

‘बुकींग सेंटर’वर शासनमान्य दर असलेल्या गाड्यांच्या तिकिटांची ‘ऑनलाईन’ विक्री दुपटीहून अधिक दराने !

ऐन दिवाळीतही मोटार वाहन (परिवहन) विभागाच्या ‘ऑनलाईन’ तक्रारीची ‘लिंक’ आणि ‘अ‍ॅप’ नादुरुस्तच !

मोटार वाहन (परिवहन) विभाग प्रवाशांच्या हितासाठी कि खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांच्या लाभासाठी ?

ठाणे जिल्ह्यातील प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांकडे हिंदु जनजागृती समितीची कारवाईची मागणी !

आयुक्तांच्या आदेशानंतरही शासनमान्य तिकीटदर न लावणार्‍या खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाच्या अंतर्गत करण्यात आली आहे.

प्रादेशिक परिवहन विभागाकडून अवैध भाडेवाढ करणार्‍या खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांवर तुटपुंजी कारवाई !

‘सनातन प्रभात’ची लोकहितकारी चळवळ !

संभाजीनगर परिवहन विभागाने ट्रॅव्हल्स मालकांना दिली भरमसाठ भाडे आकारण्याची अनुमती !

संभाजीनगरचा उपप्रादेशिक परिवहन विभाग अशा प्रकारे खासगी ट्रॅव्हल्ससाठी स्वतःच्या मनाने तिप्पट भाडेवाढ करण्याचे दरपत्रक काढू शकतो का ?

पुणे येथे नियमांचे उल्लंघन करणार्‍या १९२ खासगी बसगाड्यांवर कारवाई, १५ लाखांचा दंड वसूल !

आर्थिक लुटीला आळा घालण्यासाठी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुणे परिवहन विभागाने विशेष तपासणी मोहीम चालू केली आहे. या मोहिमच्या वेळी आर्.टी.ओ.चे नियम पाळले जात नसल्याचे आढळून आले आणि बसमध्ये प्रत्यक्ष क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवण्यात आल्याचे आढळून आले.

राज्यातील एस्.टी.च्या भाड्यात १० टक्क्यांची शुल्कवाढ लागू !

एकीकडे खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांकडून प्रवाशांची लूट चालू असतांनाच राज्य परिवहन महामंडळाने ऐन दिवाळी सणाच्या कालावधीत एस्.टी.च्या प्रवासी भाड्यात २० ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून १० टक्क्यांची शुल्कवाढ केली आहे.

खासगी गाड्यांच्या ‘एजंट’वर परिवहन खाते आणि पोलीस यांच्याकडून कोणतीच कारवाई नाही !

‘सनातन प्रभात’ची लोकहितकारी चळवळ !

खासगी प्रवासी वाहनांनी प्रवाशांकडून अधिक तिकीटदर आकारणी करू नये !  

खासगी प्रवासी वाहनांनी दीपावलीच्या काळात प्रवाशांकडून अधिक भाडे आकारू नये. प्रवाशांकडून भाडे आकारतांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने निश्‍चित केलेल्या भाडे दराच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक आकारणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयांनी खासगी ट्रॅव्हल्सच्या विरोधातील तक्रारीसाठी दिलेली संपर्क यंत्रणा कुचकामी !    

प्रादेशिक परिवहन कार्यालयांतील संपर्क क्रमांकाविषयी इतकी उदासीनता आहे, तर ‘नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अधिकार्‍यांकडून तत्परतेने कार्यवाही होत असेल का ?