शाळांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणार्‍यांना ‘मोकका’ लावू – धर्मरावबाबा आत्राम, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री

शाळांमधील विद्यार्थी नकळत व्यसनाकडे ओढला जाऊ नये, याकरता विद्यार्थ्यांचे पालक, मुख्याध्यापक, शाळा कृती समितीचे पदाधिकारी यांना सतर्क रहाण्याच्या सूचना केल्या आहेत.

‘बेस्ट’च्या स्वमालकीच्या बसचा प्रति १ किलोमीटरमागे १९४ रुपये व्यय ! – मुख्यमंत्री

‘बेस्ट’ला प्रति माह १८० कोटी रुपये हानी सहन करावी लागत आहे. त्यामुळे स्वमालकीपेक्षा भाडेतत्त्वावर गाड्यांची संख्या वाढवण्यावर भर देण्यात येत आहे.

मुंबईत अमली पदार्थ विक्रेते पोलिसांना भीक घालत नाहीत ! – आमदार सुनील प्रभु, ठाकरे गट

मुंबईसह महाराष्ट्रात अमली पदार्थांचे जाळे पसरले आहे. दिंडी, आरे, कुराड आदी परिसरात अमली पदार्थ सेवन करणारे रस्त्यावर उभे राहून महिलांना त्रास देतात.

संसदेतील घटनेचे महाराष्ट्राच्या विधीमंडळात पडसाद; अभ्यागतांना प्रवेश बंद !

लोकसभेतील घटनेनंतर तात्काळ येथील विधीमंडळाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. यासंबंधी सुरक्षारक्षकांना तात्काळ चोख सुरक्षा पडताळणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

सोसायटीत बोकड आणण्यास विरोध झाल्याचा विषय आमदार अबू आझमी यांनी विधानसभेत मांडला !

‘घरात कुत्रा पाळू शकतो. कुत्रा चावला, तर किती त्रास होतो ! बकराही पाळीव प्राणी आहे, मग तो पाळला तर गोंधळ का होतो ?

Ban Halal In Maharashtra : भारतीय अर्थव्यवस्थेवर आक्रमण करणार्‍या हलाल प्रमाणपत्रावर बंदी घाला !  – आमदार प्रताप सरनाईक, शिवसेना

आजपर्यंत ‘हलाल’ आणि ‘झटका’ हा प्रकार केवळ मटण व्यवसायामध्ये होता; मात्र काही आस्थापने कपडे, सौंदर्यप्रसाधने यांवरही हलालचा शिक्का मारत आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेवरील हे पुष्कळ मोठे आक्रमण आहे.

विधीमंडळात वारंवार प्रश्न उपस्थित होऊनही इंद्रायणी नदी प्रदूषितच !

अद्याप विकास आराखडा नाही ! मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही प्रशासनाकडून कार्यवाहीला प्रारंभ न झाल्याचा भाजपचे आमदार महेश लांडगे यांचा आरोप !

कांदा उत्पादक शेतकर्‍यांची हानी न होण्यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांशी बोलणार ! – फडणवीस

विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नियम २८९ अन्वये सूचना मांडली. त्याला उत्तर देतांना ते बोलत होते.

‘अटक वॉरंट’ पाठवून अतिरेकी पकडले जातील का ? – आमदार महेश लांडगे, भाजप

आतंकवादविरोधी पथक आणि राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा यांनी भिवंडी येथे धाड घालून आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या काही मुसलमानांना अटक केली. ‘अटक वॉरंट’ न देता ही कारवाई झाल्याची ओरड आमदार अबू आझमी यांनी विधानसभेत केली.

राज्यात ‘हमास’च्या आतंकवाद्यांचे समर्थन करणार्‍यांवर कठोर कारवाई करणार ! – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

‘हमास’ संघटनेचा कुणी उदो-उदो करत असेल, तर त्याला भारताचे समर्थन नाही. राज्यात कुणीही ‘हमास’च्या आतंकवाद्यांच्या समर्थन करत असेल, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस यांनी १२ डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत दिले.