महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशन २०२३
नागपूर, १३ डिसेंबर (वार्ता.) : मीरारोड येथील जे.पी. इन्फ्रा कॉम्प्लेक्समध्ये मोहसीन शेख नावाच्या व्यक्तीला बोकड पाळण्यावरून विरोध झाल्याचा विषय समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी थेट विधानसभेत उपस्थित केला.
फिरकापरस्ती आज देश में चरम पर है। सोसाइटियों में कुत्ता पाल सकते है जिसके काटने पर इंसान मर जाता है लेकिन आप बकरा नहीं पाल सकते। मुंबई के मीरा रोड में नार्थ गार्डन सोसाइटी हाउसिंग काम्प्लेक्स में सभी धर्मों के कार्यक्रम करने की अनुमति है लेकिन मुसलमानों को एक भी कार्यक्रम की… pic.twitter.com/tCYzqEoaYL
— Abu Asim Azmi (@abuasimazmi) December 13, 2023
‘घरात कुत्रा पाळू शकतो. कुत्रा चावला, तर किती त्रास होतो ! बकराही पाळीव प्राणी आहे, मग तो पाळला तर गोंधळ का होतो ?’, असा प्रश्न अबू आझमी यांनी १३ डिसेंबर या दिवशी सभागृहात माहितीच्या सूत्राच्या अंतर्गत उपस्थित केला. जून २०२३ मध्ये घडलेल्या या घटनेला धार्मिक स्वरूप प्राप्त झाले. या प्रकरणी विरोध करणार्या ११ हिंदूंवर पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंदवण्यात आला होता.