कांदा उत्पादक शेतकर्‍यांची हानी न होण्यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांशी बोलणार ! – फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, १२ डिसेंबर (वार्ता.) – कांद्याच्या वाढत्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रशासनाने निर्यातबंदीचा निर्णय घेतला आहे; परंतु राज्यातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांची हानी होणार नाही, यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ११ डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत सांगितले. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नियम २८९ अन्वये सूचना मांडली. त्याला उत्तर देतांना ते बोलत होते. मंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशात सध्या कांदा उपलब्ध आहे. निर्यातीसाठी अनुमती दिल्यास अडचण निर्माण होईल. शेतकर्‍यांची हानी होणार नाही, यासाठी सरकार कांदा खरेदी करण्यास सिद्ध आहे.