उत्तरप्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही हलाल उत्पादनांवर बंदी आणण्याची शिवसेनेच्या आमदारांची मागणी !

अवैधरित्या ‘हलाल प्रमाणपत्र’ देण्याच्या काळ्या धंद्यावर उत्तरप्रदेश राज्यात ज्याप्रमाणे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बंदी घातली आहे, तशीच बंदी महाराष्ट्र राज्यातही घालण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्याकडे नागपूर येथील विधानभवनात प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे.

वर्ष २०२१ मध्ये ड्रग्ज तस्कर ललित पाटील याची चौकशीच झाली नाही ! – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

१२ डिसेंबर या दिवशी ड्रग्ज तस्कर ललित पाटील संदर्भात विधानपरिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्याला उत्तर देतांना ते बोलत होते.

केंद्र सरकारने पाकव्याप्त काश्मीर भारतात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करावा ! – उद्धव ठाकरे, शिवसेना

‘अतिरेक्यांच्या भीतीमुळे काश्मीरमधून पलायन केलेल्या काश्मिरी पंडितांना आता काश्मीरमध्ये पुन्हा येऊन रहाता येईल का ?’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

‘लव्ह जिहाद’च्या विरोधात सरकार कायदा करणारच ! – नितेश राणे, आमदार, भाजप

‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कोणत्याही परिस्थितीत कायदा केला जाईल. ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात तक्रारी प्रविष्ट करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीमध्ये ४०२ हून अधिक तक्रारी प्रविष्ट झाल्या आहेत.

चेंबूर (मुंबई) येथील विद्यार्थ्यांच्या विषबाधेचा फॉरेन्सिक अहवाल २ मास रखडला !

या वेळी आमदार समाधान अवताडे यांनी माध्यान्ह पुरवणारे ठेकेदार अन्न सुरक्षा मानकानुसार पात्र आहेत का ? याची पडताळणी करण्याची सूचना सभागृहात केली.

अल्प पटसंख्या असलेली कोणतीही शाळा बंद करणार नाही ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी ११ डिसेंबर या दिवशी सभागृहात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

Samajwadi Party Muslims Appeasement : आतंकवादी कारवायांतील आरोपींविषयी अबू आझमी यांना पुळका !

अटक करतांना कुटुंबियांना माहिती देण्यात आली नसल्याविषयीचा पुळका अबू आझमी यांनी सभागृहात व्यक्त केला. अबू आझमी यांच्या या वक्तव्याला सत्ताधारी पक्षाकडून तीव्र विरोध दर्शवला.

ग्रामविकास विभाग भरतीसाठी वय ओलांडलेल्या विद्यार्थ्यांचे पैसे परत करणार ! – गिरीश महाजन, ग्रामविकासमंत्री

४ वर्षांपूर्वी ग्रामविकास विभागातील भरतीसाठी ज्या विद्यार्थ्यांनी पैसे भरले आणि ज्या विद्यार्थ्यांनी वयोमर्यादा ओलांडली, त्या विद्यार्थ्यांचे पैसे परत करण्याचा शासन निर्णय झाला आहे.

वीर सावरकर यांचा अवमान करणार्‍या काँग्रेसचा भाजपकडून निषेध !

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा मुलगा प्रियांक खर्गे यांनी नुकतेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘मी विधानसभेचे अध्यक्ष असतो, तर बेळगाव येथील विधानसभेतून सावरकरांचा फोटो काढून टाकला असता.

महाराष्ट्रात ‘कॅसिनो’ आणण्यासाठी काँग्रेसने केलेला कायदा रहित !

‘महाराष्ट्र कॅसिनो (नियंत्रण आणि कर) (निरसन) विधेयक, २०२३’ सभागृहात बहुमताने संमत करून महाराष्ट्रात कॅसिनो आणण्यासाठी सिद्ध करण्यात आलेला हा कायदा कायमचा रहित करण्यात आला.