कुडाळ शहरात जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करू पहाणार्‍या संघटनांची चौकशी करा ! – वैद्य सुविनय दामले, कुडाळ

बाळा राणे यांनी २६ जानेवारी या दिवशी घोषित केलेले आंदोलन हे त्यांचे वैयक्तिक असले, तरीही जागरूक नागरिक म्हणून माझा या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा आहे.

प्रार्थनास्थळांवरील ध्वनीक्षेपकांच्या आवाजावर मर्यादा घालावी, अन्यथा मनसे रस्त्यावर उतरणार !

अशी चेतावणी का द्यावी लागते ? पोलीस स्वतःहून न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही का करत नाहीत ?

मशिदीवरील भोंग्याच्या आवाजाला कंटाळून पानबाजार, कुडाळ येथील बाळा राणे यांचा दुकान विकण्याचा निर्णय !

राणे यांच्यावर आलेली ही वेळ हिंदूंना विचार करायला लावणारी आणि वस्तूस्थितीची जाणीव करून देणारी आहे ! निवेदनांकडे दुर्लक्ष करण्याच्या पोलिसांच्या वृत्तीमुळे नागरिकांनी कायदा हातात घेतला, तर आश्चर्य वाटू नये !

कर्नाटकमध्ये १० सहस्र ८८९ मशिदींना भोंगा लावण्याची अनुज्ञप्ती

केवळ ३ सहस्र मंदिरांवरच भोंगे लागणार !

नाशिक येथील भोंगे ७ दिवसांत हटवा, अन्यथा दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावू !

मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर म्हणाले की, सणासुदीच्या काळात कर्णकर्कश भोंगे वाजवले गेले, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. पोलिसांकडे त्याविरोधात तक्रार केली असून नोंद न घेतल्यास ७ दिवसानंतर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा पठण केले जाईल.

‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्या विरोधात सोलापूर येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’ !

येथील जिल्हा परिषद, पूनम गेट द्वाराजवळ हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने १७ ऑगस्ट या दिवशी सकाळी ११ वाजता ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’ करण्यात आले.

‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ केवळ हिंदूंच्या विरोधात एकांगी कारवाई करत आहे ! – संतोष देसाई, हिंदु जनजागृती समिती

वर्षातील ३६५ दिवस पाचवेळा मशिदींच्या भोंग्याद्वारे होणार्‍या ध्वनीप्रदूषणाकडे दुर्लक्ष केले जाते. केवळ हिंदूंच्या सणांच्या वेळी ‘प्रदूषण होते’ अशी आवई उठवत ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ केवळ हिंदूंच्या विरोधात एकांगी कारवाई करत आहे, तसेच हिंदूंच्या सणांना अपकीर्त करणारे अहवालही प्रसिद्ध करत आहे.

हिंदूंच्या सणांच्या वेळी २३०; मात्र मशिदींवरील भोंग्यांवर केवळ २२ खटलेच प्रविष्ट ! – हिंदु जनजागृती समिती

हिंदूबहुल महाराष्ट्रात हिंदूंच्याच संदर्भात दुटप्पीपणा करणार्‍या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला वेळीच खडसवा !

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथील मशिदीवरील भोंगे बंद करण्यात यावेत !

मशिदीवरील भोंग्यांमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषण होत आहे. त्यामुळे भोंगे बंद करण्याविषयी योग्य ती उपाययोजना करण्यात यावी, तसेच तुळजापूर खुर्द येथील सभागृहावरील ‘मशीद’ हे नाव हटवण्यात यावे, या मागण्यांचे निवेदन ‘शिवबाराजे प्रतिष्ठान’च्या वतीने तहसील कार्यालयात देण्यात आले.

प्रार्थनास्थळांवरील विनाअनुमती असणाऱ्या भोंग्यांच्या संख्येविषयी नागपूर महापालिका अनभिज्ञ !

विनाअनुमती भोंग्यांच्या संख्येविषयी अनभिज्ञ असणाऱ्या नागपूर महापालिकेच्या क्षेत्रात किती अवैध गोष्टी चालत असतील ?