कोकणात कायमस्वरूपी ‘आपत्ती प्रतिसाद दल’ उभारण्याची उपमुख्यमंत्र्यांची घोषणा !

दैनिक ‘सनातन प्रभात’ने वाचा फोडलेल्या विषयावर प्रवीण दरेकर यांचा विधान परिषदेत आवाज !.

मुंबई, ४ ऑगस्ट (वार्ता.) – कोकणात पावसाळ्यात प्रतिवर्षी दरडी कोसळतात. मागील मासात रायगड जिल्ह्यातील इरशाळवाडी येथे दरड कोसळून २९ जणांचा दुर्दैवी  मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर कोकणात ३ ते ४ ठिकाणी कायमस्वरूपी ‘आपत्ती निवारण केंद्रे’ उभारावीत, अशी मागणी भाजपचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेत केली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकणात कायमस्वरूपी आपत्ती निवारण केंद्रे उभारणार असल्याची घोषणा केली.

दैनिक ‘सनातन प्रभात’मधून याविषयी सर्वप्रथम आवाज उठवण्यात आला होता. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या २० जुलैच्या अंकात पहिल्या पृष्ठावर ‘वारंवार दुर्घटना घडूनही कोकणात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची स्थापना नाही’, हे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्तामध्ये वर्ष २०२१ मध्ये रायगड जिल्ह्यातील महाड येथे होऊ घातलेले राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल राज्याच्या बाहेर हालवण्याच्या हालचाली चालू असल्याचे नमूद करण्यात आले होते. दैनिक ‘सनातन प्रभात’मधील या वृत्ताविषयी मागील आठवड्यात विधानसभेत चर्चा झाली. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे दल महाड येथेच उभारण्याकडे लक्ष देण्याचे आश्वासन दिले होते.


सविस्तर वृत्ते वाचा – 

♦ #Exclusive : वारंवार दुर्घटना घडूनही कोकणात ‘एन्.डी.आर्.एफ्.’ला मान्यता नाही !
https://sanatanprabhat.org/marathi/703197.html

♦ #Exclusive : ‘एन्.डी.आर्.एफ्.’चे केंद्र राज्याबाहेर जाऊ न देता कोकणातच रहाणार !
https://sanatanprabhat.org/marathi/704503.html


मशिदींवरील भोंग्यांतून होणार्‍या प्रदूषणाच्या विरोधात कारवाई व्हावी !

मशिदींवरील भोंग्यांविषयी सर्वाेच्च न्यायालयाने काही आदेश दिले आहेत; परंतु त्यांचे पालन होत नाही; मात्र याविषयी पोलीस कारवाईचे अधिकार नसल्याचे सांगतात. याविषयी कारवाई व्हायला हवी, अशी मागणीही प्रवीण दरेकर यांनी या वेळी केली. याविषयीही ३१ जुलै या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये पृष्ठ १ वर ‘मशिदींवरील भोंग्यांच्या ध्वनीप्रदूषणाकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचा कानाडोळा’ हे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. यावर उत्तर देतांना देवेंद्र फडणवीस यांनी ‘मशिदींवरील भोंग्यांविषयी सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशाचे तंतोतंत पालन केले जाईल. ज्या ठिकाणी पालन होत नाही, तेथे कारवाई केली जाईल’, असे आश्वासन दिले.

याबद्दलचे सविस्तर वृत्त – 

♦ #Exclusive : (म्हणे) ‘दिवाळीत फोडण्यात येणारे फटाके, ही पर्यावरणाची सर्वांत गंभीर समस्या !’ – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
मशिदींवरील भोंग्यांच्या ध्वनीप्रदूषणाकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचा कानाडोळा !
https://sanatanprabhat.org/marathi/706685.html