मडगाव येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयातील संयुक्त बैठकीत निर्णय
मडगाव, ७ नोव्हेंबर (वार्ता.) : दवर्ली येथील मशिदीवरील ध्वनीक्षेपकाचा आवाज थांबवावा, या मागणीसाठी दवर्ली येथील श्री दुर्गामाता मंदिर समिती आणि ग्रामस्थ यांनी २ नोव्हेंबर या दिवशी दक्षिण गोवा जिल्हाधिकार्यांची भेट घेतली होती. जिल्हाधिकार्यांनी दोन्ही बाजू ऐकून घेण्यासाठी ६ नोव्हेंबर या दिवशी एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीनंतर मडगाव येथे उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात ६ नोव्हेंबरला दुर्गामाता मंदिर आणि दवर्ली हाऊसिंग बोर्डमधील अल मजिदा मशीद यांच्या सदस्यांना बोलावून एक बैठक घेण्यात आली. यामध्ये मशिदीतून आवाज न्यून करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे गेले ८ मास मशिदीतून होणार्या ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात श्री दुर्गामाता मंदिर समिती संघर्ष करत होती; मात्र ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात कोणतीच कारवाई झालेली नव्हती.
दुर्गामाता मंदिराचे अध्यक्ष तेंडुलकर या निर्णयाविषयी म्हणाले, ‘‘आम्ही आवाज बंद करण्यासाठी तक्रार केली होती; पण तसा निर्णय झाला नाही. आताच्या निर्णयामुळे आता ८ दिवस आवाज अल्प होणार आणि नंतर पुन्हा आहे तसाच आवाज मोठा केला जाणार.’’ (धर्मांधांच्या विरोधात बोटचेपी भूमिका घेणारे पोलीस आणि प्रशासन यांच्यामुळेच हिंदूंना ‘केवळ ८ दिवस कार्यवाही होईल’, असे वाटते ! – संपादक)
सविस्तर वृत्त वाचा –
♦ Remove Loudspeakers On Mosque दवर्ली येथील मशिदीवरील भोंगे हटवा !
https://sanatanprabhat.org/marathi/734366.html
संपादकीय भूमिकाकोळसा वाहतुकीमुळे होणार्या वायूप्रदूषणाविरुद्ध आवाज उठवणारे मशिदींवरील ध्वनीक्षेपकांमुळे होणार्या ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात गप्प का ? |