धर्मांतरबंदी कायदा करण्याच्या विषयात लक्ष घालतो !  डॉ. रणजीत पाटील, गृहराज्यमंत्री

धर्मांतरबंदी कायदा करण्याच्या विषयात लक्ष घालतो. याविषयी मुख्यमंत्र्यांशी बोलतो, असे आश्‍वासन राज्याचे गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजीत पाटील यांनी दिले. धर्मांतरबंदी कायदा करण्यासाठी नुकतीच हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने त्यांची विधानभवनात भेट घेतली.

मराठी भाषा टिकण्यासाठी मराठी भाषा शिक्षण कायदा करा ! – को.म.सा.प.ची मागणी

मराठी भाषा शिक्षण कायदा करावा, तसेच मराठी भाषा विकास प्राधिकरण स्थापन करावे, अशी मागणी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या (को.म.सा.प.च्या) सिंधुदुर्ग शाखेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.

राज्यात धर्मांतरबंदी कायदा लागू व्हावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांना निवेदन

न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रात तात्काळ ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करण्यात यावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिवसेनेचे नांदेड येथील आमदार हेमंत पाटील यांना निवेदन देण्यात आले. विधीमंडळात चालू असलेल्या अर्थसंकल्प अधिवेशनात हा कायदा होण्यासाठी मागणी करावी

मानवनिर्मित जंगलांची हानी करणार्‍यांना शिक्षा करण्याविषयीचे विधेयक लोकसभेत सादर

मानवनिर्मित जंगलांनाही सध्याच्या कायद्यांच्या कक्षेत आणणारे खासगी विधेयक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ८ फेब्रुवारीला लोकसभेत मांडले. देशभरात अनेक ठिकाणी जाणीवपूर्वक वणवे लावून जंगले नष्ट केली जातात. त्यामुळे मानवनिर्मित जंगलांनाही कायद्याचा आधार असला पाहिजे.

पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्यासह इतर राजकारण्यांवरील खटला मागे घेण्यात अनियमितता असल्याविषयी याचिका 

पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्यासह इतर राजकारण्यांचा खटला मागे घेण्यात मोठी अनियमितता झाली आहे, असा दावा करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली आहे.

आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारने शाळांमध्ये मराठी भाषा शिकवण्याचा सक्तीचा कायदा करावा !

आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारने शाळांमध्ये मराठी भाषा शिकवण्याच्या सक्तीचा कायदा करावा, अशी मागणी साहित्यिक आणि अभ्यासक यांच्याकडून केली जात आहे. त्या दृष्टीने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी…

शासनाच्या भाषा संचालनालयाकडून परिभाषा कोश आणि मराठी विश्‍वकोश यांच्या अ‍ॅपची निर्मिती

शब्दाचे अर्थ, शब्दाचे स्पष्टीकरण किंवा प्रतीसंज्ञा लक्षात यावी, संकल्पना सुस्पष्ट व्हावी, यासाठी निर्माण झालेले मराठी विश्‍वकोश आणि परिभाषा कोश यांचे ‘अ‍ॅप’ आता उपलब्ध होणार आहे. राज्यशासनाच्या भाषा संचालनालयाने ही निर्मिती केली आहे. ‘गुगल प्ले स्टोअर’वर हे दोन्ही अ‍ॅप उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

सत्ता आल्यास तोंडी तलाकविरोधी कायदा रहित करणार ! – काँग्रेस

महिलांवरील अत्याचारांपेक्षा मुसलमानांच्या मतांसाठी प्रयत्न करणार्‍या काँग्रेसचे खरे स्वरूप आतातरी महिलांना समजेल का ?

लोकायुक्तांना प्राप्त होणार मुख्यमंत्र्यांच्या अन्वेषणाचे अधिकार !

सह्याद्री अथितीगृह येथे २९ जानेवारी या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत ‘लोकायुक्त, उपलोकायुक्त अधिनियम सुधारणा’ संमत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या सुधारणेमुळे आता मुख्यमंत्रीही लोकायुक्तांच्या कक्षेत आले असून लोकायुक्तांना मुख्यमंत्र्यांचे अन्वेषण करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे……….

भारतातील कुष्ठरोग्यांची वाढती संख्या चिंताजनक ! – जागतिक आरोग्य संघटना

जगभरातील अर्धे कुष्ठरोगी भारतात आहेत. कुष्ठरोगाविषयीची समाजातील अनास्था, कुष्ठरोग्यांसमवेत होणारा भेदभाव, अज्ञान, तसेच जनजागृतीचा अभाव या कारणांमुळे भारतात कुष्ठरोग्यांचे प्रमाण वाढत आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात म्हटले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now