बेंगळुरू (कर्नाटक) – केंद्र सरकारने लागू केलेल्या वक्फ सुधारणा कायद्याला आमच्या सरकारचा विरोध आहे. राज्यात तो लागू करणार नाही, असे कर्नाटकातील काँग्रेस सरकारमधील गृहनिर्माणमंत्री जमीर अहमद खान यांनी घोषित केले आहे. हा कायदा बंगाल, केरळ आणि तमिळनाडू सरकारांनी लागू न करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही त्यांनी नमूद केले.

(संसदेचे कायदे लागू न करण्याचा निर्णय घेण्याचे राज्यांचे धाडस होतेच कसे ? केंद्र सरकारने अशी घटनाद्रोही राज्य सरकारे तात्काळ विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे ! – संपादक)
संपादकीय भूमिकाभारतीय राज्यघटना खिशात ठेवून वेळोवेळी ती दाखवून ‘आम्ही राज्यघटनेचे रक्षरकर्ते आहोत’, असे जनतेला सांगणारी काँग्रेस भारतीय संसदेने बहुमताने संमत केलेला कायदा लागू न करण्याचे घोषित करून ती राज्यघटनाद्रोही हे दाखवून देत आहे ! |