India Slams Pakistan On Waqf Bill : पाकने भारताऐवजी स्वतःच्या देशांतील अल्पसंख्यांकांच्या स्थितीकडे लक्ष द्यावे !

भारताने वक्फ कायद्यावरून विधान करणार्‍या पाकला फटकारले !

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल

नवी देहली –  शेजारी देशाला भारताच्या अंतर्गत गोष्टींवर विधान करण्याचा कोणताही अधिकार नाही. अल्पसंख्यांकांच्या हक्कांचे रक्षण करण्याचा विचार केला, तर पाकिस्तानने इतरांना उपदेश करण्याऐवजी स्वतःच्या वाईट कामगिरीकडे पाहिले पाहिजे, अशा शब्दांत भारताने पाकिस्तानला वक्फ सुधारणा कायद्यावरून भारतावर टीका केल्यावरून फटकारले.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल म्हणाले की, पाकिस्तानचे विधान निराधार आणि निरुपयोगी आहे.

पाकिस्तानी वृत्तपत्रांनी वक्फ सुधारणा कायदा मुसलमानांच्या विरोधात असल्याचे म्हटले होते.