महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण होऊ देणार नाही ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
काहीही झाले, तरी महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचे महिमामंडन (प्रशंसा) आणि उदात्तीकरण होऊ देणार नाही. तसे करण्याचा कुणी प्रयत्न केल्यास तो प्रयत्न त्याच ठिकाणी चिघळून टाकण्याचे काम करू, हे वचन देतो, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १७ मार्च या दिवशी दिली.