
कोल्हापूर – ‘शिवाजी विद्यापीठ’ नाव कायम असावे, या मागणीसाठी आयोजित बैठकीत ‘शिवाजी विद्यापीठ’ नामविस्ताराचा प्रयत्न केल्यास ठोकून काढू !’, अशी चेतावणी देण्यात आली. या संदर्भातील वृत्ते अन्य दैनिकांमध्ये प्रसिद्ध झाली आहेत. ‘शिवाजी विद्यापिठा’चा नामविस्तार ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ होऊ नये, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. (एकीकडे ‘भारतात लोकशाही आहे’, ‘कायद्याचे राज्य आहे’, असे म्हणायचे आणि दुसरीकडे ‘ठोकून काढण्या’ची भाषा करायची, हा विरोधाभासच नाही का ? ज्या शिवछत्रपतींनी ५ पातशाह्यांना धूळ चारत हिंदूंचे राज्य निर्माण केले, अशा हिंदूंच्या अस्मितेचा मानबिंदू निर्माण करणार्यांना ‘छत्रपती’, असे म्हणण्यास पुरोगाम्यांना वावडे का ? असा विरोध म्हणजे छत्रपतींना विरोध नाही का ? – संपादक)
याच समवेत कोल्हापूर येथील ज्या लोकप्रतिनिधींनी विद्यापिठाच्या नामविस्ताराला पाठिंबा दिला, त्या सर्व लोकप्रतिनिधींचा या बैठकीत निषेध करण्यात आला. (निवडून आलेले लोकप्रतिनिधी सहस्रो नागरिकांचे प्रतिनिधीत्व करतात. लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या आणि योग्य विषयाला पाठिंबा देणार्या लोकप्रतिनिधींचा निषेध करणे म्हणजे एक प्रकारे लोकशाहीवरच अविश्वास दाखवल्यासारखे आहे ! याच समवेत जे लोकप्रतिनिधी यापूर्वी पुरोगाम्यांच्या विषयाला संमती देत त्यांचा उदोउदो करणे आणि जे हिंदुत्वाच्या,राष्ट्र-धर्म विषयांच्या बाजूने उभे रहातात त्यांना विरोध करणे हा पुरोगाम्यांचा दुतोंडीपणा आहे ! पुरोगाम्यांच्या हा दुतोंडीपणा लक्षात आल्यानेच कोल्हापूर जिल्ह्यातून हिंदूविरोधी लोकप्रतिनिधींना जागृत नागरिकांनी घरी बसवले आहे ! – संपादक)
‘शिवाजी विद्यापिठा’च्या अधिसभेत नामविस्तारावरून गदारोळ आणि विरोध !
‘शिवाजी विद्यापिठा’च्या १५ मार्चला झालेल्या अधिसभेत काही सदस्यांनी काळ्या फिती लावून नामविस्ताराचा विरोध केला. यानंतर काही सदस्यांनी ‘शिवाजी विद्यापीठ’ हेच नाव कायम रहाण्यासाठी काही सदस्यांनी घोषणा दिल्या. प्रारंभी ‘शिवाजी विद्यापिठाचा नामविस्तार होऊ नये’ या मागणीचा स्थगन प्रस्ताव ठेवण्यात आला. हा प्रस्ताव स्वीकारण्यात न आल्याने परत गदारोळ झाला. अखेर चर्चेविनाच हा प्रस्ताव स्वीकारण्यात आला. या वेळी ‘आमचे विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ’, अशा घोषणा देण्यात आल्या. या सभेसाठी कुलगुरु डॉ. डी.टी. शिर्के यांसह अन्य अधिकारी उपस्थित होते.
संपादकीय भूमिकाएकीकडे लोकशाही आणि राज्यघटना यांच्या गप्पा करायच्या अन् दुसरीकडे ‘कायदा हातात’ घेण्याची भाषा हा दुतोंडीपणा आता जागृत नागरिकांच्या लक्षात आला आहे ! |