सानपाडा ए.पी.एम्.सी. येथे भव्य शिवजयंती सोहळ्याचे आयोजन !

छत्रपती शिवाजी महाराज

नवी मुंबई – शिवबा मित्र मंडळ आणि सानपाडा युवा सामाजिक संथा त्यांच्या वतीने १७ मार्च या दिवशी शिवसेना शाखा सानपाडा गाव येथे शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने सकाळी रक्तदान शिबिर, विनामूल्य नेत्रचिकित्सा शिबिर होणार आहे. शिबिरात सहभागी केशरी शिधाधारक किंवा अल्प उत्पन्नधारक रुग्णांस मोतीबिंदूचे निदान झाले, तर विनामूल्य उपचार करण्यात येणार आहे. शिवप्रतिमा पूजन, सत्यनारायण महापूजा, भव्य मिरवणूक, त्यानंतर महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर यांनी दिली.

‘राजे शिवाजी उत्सव मंडळ’ यांच्या वतीने हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सकाळी १० वाजता भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती स्थापन करून शिवकालीन चलचित्र, घोड्यावरून महाराजांची आणि मावळ्यांची भव्य मिरवणूक शिवकालीन खेळ, शिवकालीन देखावे असणार आहेत. त्याचप्रमाणे मार्केटमध्ये कार्यक्रमाच्या ठिकाणी १८ फूट उंच ज्योतिबा देवाचा देखावा, २४ फूट उंच केदारनाथ मंदिर आणि रायगड यांचा देखावा असणार आहे.