शिवाजी विद्यापीठ नामविस्ताराला विरोध करणार्‍या आयोजकांना समज द्या !

लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात तक्रार

कोल्हापूर, १५ मार्च (वार्ता.) – शिवाजी विद्यापिठाच्या नामविस्ताराच्या विरोधात घेतलेल्या बैठकीत ‘नामविस्ताराचा प्रयत्न केल्यास ठोकून काढू’, अशी भाषा वापरण्यात आली. याविषयीची वृत्ते प्रसिद्ध झाली आहेत. ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ नामविस्तार हा विषय महत्त्वाचा असून लाखो शिवभक्तांच्या भावना याला जोडलेल्या आहेत. जे संयोजक/आयोजक मोर्चाला विरोध करण्याची किंवा ‘ठोकून काढण्याची भाषा करत आहेत’, त्यांना योग्य समज द्यावी, त्यांनी मोर्चात बाधा आणू नये, यासाठी योग्य ती कारवाई करावी, अशी तक्रार श्री. शिवानंद स्वामी आणि श्री. आनंदराव पवळ यांनी कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालय आणि लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात केली आहे.

तक्रारीत म्हटले आहे की,

१. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने विद्यापिठाचा नामविस्तार करणे, ही महाराष्ट्रातील शिवभक्तांची भावनिक आणि सांस्कृतिक आवश्यकता आहे.

२. एरवी जे लोक ‘राज्यघटने’चा संदर्भ देऊन बोलतात, तेच लोक आता विरोधात बोलत होते. भारतात लोकशाही आणि कायद्याचे राज्य असतांना ‘ठोकून काढू’, ही भाषा चेतावणी देणारी आहे अन् घटनाबाह्य आहे. संबंधितांवर योग्य कारवाई करावी.

संपादकीय भूमिका :

‘ठोकून काढू’, अशी भाषा उच्चारणार्‍यांवर वेळीच कारवाई केल्यास असे बोलण्याचे पुन्हा कुणाचे धाडस होणार नाही !