Statue of Chhatrapati Shivaji Maharaj collapsed : शिल्‍पकार जयदीप आपटे यांना कल्‍याण येथे अटक !

मालवण येथील राजकोट गडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्‍याच्‍या प्रकरणी पोलिसांनी शिल्‍पकार जयदीप आपटे यांना अटक केली आहे.

स्टेनलेस स्टिलचा वापर केला असता, तर पुतळा कोसळला नसता ! – नितीन गडकरी

जर मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बांधकामात स्टेनलेस स्टिलचा वापर केला असता, तर तो पुतळा पडला नसता, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देहली येथे केले.

चुकीचा इतिहास शिकवला, याविषयी काँग्रेस क्षमा मागणार का ? – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

काँग्रेस पक्ष किंवा महाविकास आघाडी यांनी कधीही छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मान केला नाही. पंडित नेहरू किंवा इंदिरा गांधी यांनी लाल किल्ल्यावरील भाषणांमध्ये कधीही छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेखही केला नाही.

आमदार वैभव नाईक यांची शिल्पकार, सल्लागार यांसह राज्याच्या मुख्य सचिवांनाही नोटीस !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या निर्मिती आणि उभारणी प्रक्रियेतील त्रुटींवर या नोटीसीद्वारे बोट ठेवण्यात आले आहे.

बांधकाम सल्लागार चेतन पाटील यांना पोलीस कोठडी

राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळून दुर्घटना घडली होती. या प्रकरणातील संशयित आरोपी असणारे बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील यांना ३१ ऑगस्‍टला येथील न्‍यायालयाने ५ सप्‍टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दुर्घटनेच्या चौकशीसाठी तज्ञ समितीची स्थापना !

राजकोट दुर्गावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी भारतीय नौदलाचे तज्ञ कमोडोर पवन धिंगरा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली.

राजकोट दुर्गावर शिवरायांचा नवीन पुतळा उभारण्यासाठी समितीची स्थापना !

नवीन पुतळ्याविषयीची संकल्पना, कामाचे स्वरूप, कार्यपद्धती यांचा अभ्यास ही समिती सरकारला सादर करेल. याविषयीचा अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचे निर्देश सरकारने समितीला दिले आहेत.

राजकोट येथील घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र

राजकोट किल्ला येथे शिवरायांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल.अशी माहिती अजित पवार यांनी येथे दिली.

PM Modi in Palghar Maharashtra : मी छत्रपती शिवाजी महाराज यांंच्‍यापुढे नतमस्‍तक होऊन क्षमा मागतो ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर ते आमचे आराध्‍यदैवत आहे. माझे संस्‍कार वेगळे आहेत. मी क्षमा मागण्‍यासाठी सिद्ध आहे.माझे संस्‍कार वेगळे आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

पुतळा ३५ फूट उंच असेल, याची आम्हाला माहिती नव्हती ! – राजीव मिश्रा, संचालक, कला संचालनालय

पुतळा ३५ फूट उंचीचा उभारला जाणार होता, याची आम्हाला माहिती नव्हती, अशी माहिती कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांनी ‘टी.व्ही. ९’ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले.