हिंदु महिलांविषयी अश्‍लाघ्य टिपणी असलेल्या कादंबरीला केरळ साहित्य अकादमीचा सर्वश्रेष्ठ कादंबरीचा पुरस्कार !

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे. साम्यवादी आघाडी सरकार सत्तेत असलेल्या केरळमधील साहित्य अकादमीकडून याहून वेगळी अपेक्षा तरी काय करणार ? हिंदूंनी याविरोधात संघटित होणे आवश्यक आहे.

सीतापूर (उत्तरप्रदेश) येथे भूमीच्या वादातून धर्मांधांकडून महंत मुनि बजरंग दास यांच्यावर प्राणघातक आक्रमण

उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना सातत्याने हिंदूंचे संत, महंत आणि पुजारी यांच्यावर आक्रमणे होत आहेत, तसेच हत्या होत आहेत. हे हिंदूंना अपेक्षित नाही ! आता प्रशासनाने धर्मांधांवर वचक निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत !

ओटीटी अ‍ॅप्सवर नियंत्रण ठेवण्याचा सरकार विचार करत आहे !

ओटीटी अ‍ॅप्सवरील वेब सिरीजद्वारे हिंदूंच्या देवता, राष्ट्रपुरुष, भारतीय वायूदल आदींचा अवमान करण्यात येत असून हा प्रकार गेले अनेक मास चालू आहे. अनेक संघटना याचा विरोध करत असतांना सरकार अजून विचारच करत आहे, हे राष्ट्रप्रेमी आणि हिंदु धर्मप्रेमी यांना अपेक्षित नाही !

पॉप गायिका रिहाना हिने श्री गणेशाचे पदक घालून काढली स्वतःची अर्धनग्न छायाचित्रे !

रिहानाने तिच्या धर्मातील श्रद्धास्थानाचे पदक घालण्याचे धारिष्ट्य दाखवलेले नाही ! हिंदूंना डिवचण्यासाठी विदेशींकडून हेतूपुरस्सर हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे अश्‍लाघ्य विडंबन करण्यात येते. हे रोखण्यासाठी भारत सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक !

भोपाळ येथे ‘व्हॅलेंटाईन डे’ला तोडफोड केल्याच्या प्रकरणी भाजपच्या माजी आमदारासह १७ जणांना अटक

‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करत त्यांनी येथील रेस्टॉरंट आणि हुक्का बार यांची तोडफोड केली होती.

मशिदी मुसलमान आणि चर्च ख्रिस्ती चालवतात; मग हिंदूंना मंदिरे चालवण्याचा अधिकार का नाही ? – केरळचे भाजप अध्यक्ष के. सुरेंद्रन्

बहुसंख्य समुदायावर लादलेली धर्मनिरपेक्षता इतर धर्मांसाठी नाही. मार्क्सवादी आणि काँग्रेस चे नेते मानसिक संतुलन गमावल्यासारखे वागत आहेत.

(म्हणे) ‘भाजप सरकारच्या काळात हिंदू असुरक्षित !’ – आम आदमी पक्षाची रिंकू शर्मा यांच्या हत्येवरून टीका

देहलीत आम आदमी पक्षाचे सरकार आहे. राजधानीत समाजविघातक कारवाया करणारे रोहिंग्या मुसलमान आणि बांगलादेशी घुसखोर अवैधपणे रहात असून त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. याविषयी आपवाले कधील ‘ब्र’ही काढत नाहीत !

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या वेब सिरीजवर सेन्सॉरशिप आणा ! – लोकसभेत भाजपच्या खासदारांची एकमुखी मागणी

भाजपच्या खासदारांनी वेब सिरीजवर सेन्सॉरशिप या मागणीचा कारवाई होईपर्यंत पाठपुरावा करावा !

हिंदूराष्ट्र सेनेच्या वतीने तळोदा (जिल्हा नंदुरबार) येथे पोलिसांना निवेदन !

पुणे येथे ३१ जानेवारीला पार पडलेल्या एल्गार परिषदेत शरजील उस्मानी या धर्मांधाने ‘आजचा हिंदु समाज हा पूर्णतः सडला आहे’, असे धर्मद्रोही वक्तव्य करत हिंदु समाजाला हीन लेखण्याचा प्रयत्न केला आहे.

ट्विटरकडून भारतविरोधी ९७ टक्के खाती बंद

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर भारताविषयी चुकीची आणि चिथावणीखोर माहिती पसरवणार्‍या ट्विटर खात्यांवर बंदी घालण्याची मागणी केंद्र सरकारने लावून धरल्यानंतर ट्विटरने ९७ टक्के खाती बंद केली आहेत.