एल्गार परिषदेवर संपूर्ण भारतात बंदी घालण्याची मागणी !
नंदुरबार, १३ फेब्रुवारी (वार्ता.) – पुणे येथे ३१ जानेवारीला पार पडलेल्या एल्गार परिषदेत शरजील उस्मानी या धर्मांधाने ‘आजचा हिंदु समाज हा पूर्णतः सडला आहे’, असे धर्मद्रोही वक्तव्य करत हिंदु समाजाला हीन लेखण्याचा प्रयत्न केला आहे. एल्गार परिषदेच्या माध्यमातून दोन समाजांत तेढ निर्माण केली जात असून या परिषदेवर संपूर्ण भारतात बंदी घालण्यात यावी, तसेच शरजील उस्मानीवर देशद्रोहाचा आणि परिषदेच्या आयोजकांवरही गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी मागणी हिंदूराष्ट्र सेनेच्या वतीने तळोदा येथील पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर सर्वश्री अमन जोहरी, पारस परदेशी, किरण ठाकरे, कार्तिक शिंदे, योगेश चौहान, खलील पिंजारी, महेश बोरसे, सौरभ कलाल, प्रसाद पाठक, गौतम राठोड, नंदराज राजपूत या हिंदुत्वनिष्ठांच्या स्वाक्षर्या आहेत.