पॉप गायिका रिहाना हिने श्री गणेशाचे पदक घालून काढली स्वतःची अर्धनग्न छायाचित्रे !

सामाजिक माध्यमांतून विरोध !

  • असे छायाचित्र काढतांना रिहानाने तिच्या धर्मातील श्रद्धास्थानाचे पदक घालण्याचे धारिष्ट्य दाखवलेले नाही, हे लक्षात घ्या !
  • केवळ अशा छायाचित्रांसाठी हे पदक घातले आहे, एरव्ही रिहानाकडून हे पदक घालून श्री गणेशावर श्रद्धा दाखवण्यात आलेली नाही, हे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी लक्षात घेतील का ? यावरून तिचा हिंदुद्वेषच दिसून येतो !
  • हिंदूंना डिवचण्यासाठी विदेशींकडून हेतूपुरस्सर विविध माध्यमांद्वारे हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे अश्‍लाघ्य विडंबन करण्यात येते. हे रोखण्यासाठी भारत सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक !

नवी देहली – भारतातील शेतकरी आंदोलनावरून ट्वीट करत त्याचे समर्थन करणारी अमेरिकेतील पॉप गायिका रिहाना हिने आता अंतर्वस्त्राच्या एका विज्ञापनासाठी अर्धनग्न स्थितीतील छायाचित्रे काढली आहेत. यात तिने गळ्यात भगवान श्रीगणेशाचे पदक (पेंडेंट) घातले आहे. त्यामुळे तिच्यावर सामाजिक माध्यमांतून टीका होत आहे.

केंद्रीयमंत्री गिरिराज सिंह याविषयी म्हणाले, ‘‘मी हे छायाचित्र पाहिले नाही; मात्र भारतात सनातन हिंदु धर्म हा सहिष्णु धर्म आहे. याचा अपलाभ चित्रपट, विज्ञापन बनवणारे आणि तुकडे तुकडे टोळी घेत आहे. ते केवळ हिंदु धर्मांचाच अवमान करतात. त्यांना अन्य धर्मियांवर असे करण्याचे धाडस होत नाही, अन्यथा हाहाकार माजेल. हे आमच्या धैर्याची परीक्षा घेतात.’’

(सौजन्य : IndiaTV News)

Rihanna Shares Topless Photo With Ganesh Pendant, Triggers Controversy

(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. –  संपादक)

यापूर्वी केला होता ‘हदीस’चा अवमान

यापूर्वी रिहाना हिने अशा प्रकारच्या एका व्हिडिओमध्ये गायलेल्या एका गाण्यामध्ये इस्लाममधील हदीसचा वापर केला होता. (हदीस म्हणजे महंमद पैगंबर यांनी केलेले मार्गदर्शन) यावरून झालेल्या वादानंतर तिला क्षमा मागावी लागली होती. (मुसलमानांची क्षमा मागणारी रिहाना हिंदूंची क्षमा मागणार का ? – संपादक)